जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीला देशद्रोही घोषीत करा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जम्मु काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री व पी.डी.पी.च्या वादग्रस्त नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी नुकतेच “जोपर्यंत जम्मु काश्मीर मध्ये ३७० वे कलम रद्द होत नाही तोपर्यंत भारताचा तिरंगा ध्वज फडकविणार नाही”असे राष्ट्रविरोधी विधान करून या देशाचा व या देशातील घटनेचा अपमान केलेला आहे अशा राष्ट्रद्रोही विधान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी (वसंत स्मृतीच्या) वतीने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.त्याबाबतचे निवेदन नुकतेच कोपरगावचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

मेहबुबा मुफ्ती यांचे वडील या देशाचे गृहमंत्री होते. त्यांची कन्या इतके टोकाचे देशद्रोही वक्तव्य करते,याचा अर्थ ते या भारताशी एकरूप होण्यास तयार नाहीत असाच समजायला हवा.जोपर्यंत हाती सत्ता, तोपर्यंत त्या सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि सत्ता हातची गेली की, शेजारच्या देशांच्या मदतीने फुटीरतावादी शक्तींना बळ मिळेल, अशा कारवाया करायच्या हे आता नेहमीचे घडून येत आहे.त्याबाबत देशभरात निषेध होत आहे.

जम्मू-काश्मीरला जे विशेषाधिकार देण्यात आले होते ते रद्द करण्याचा निर्णय फारुख अब्दुल्ला,ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती,सज्जाद लोन,महम्मद युसूफ तारिगामी आदी नेत्यांना मान्य नाही.भारत सरकारने ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ ही कलमे पुन्हा लागू करावीत, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या नेत्यांकडून जनआघाडी स्थापना करण्यात आली आहे.मेहबुबा मुफ्ती यांनी, “काश्मीरला पुन्हा पूर्वीचा दर्जा प्राप्त होईपर्यंत तिरंगा ध्वज हाती घेणार नाही,”असे जे वादग्रस्त व देशद्रोही वक्तव्य केले त्याचा सर्वस्तरांतून निषेध केला जात आहे.मेहबुबा मुफ्ती यांचे वडील या देशाचे गृहमंत्री होते. त्यांची कन्या इतके टोकाचे देशद्रोही वक्तव्य करते,याचा अर्थ ते या भारताशी एकरूप होण्यास तयार नाहीत असाच समजायला हवा.जोपर्यंत हाती सत्ता, तोपर्यंत त्या सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि सत्ता हातची गेली की, शेजारच्या देशांच्या मदतीने फुटीरतावादी शक्तींना बळ मिळेल, अशा कारवाया करायच्या हे आता नेहमीचे घडून येत आहे.त्याबाबत देशभरात निषेध होत आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही येथील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी नुकतेच कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करून त्यांच्या देशविरोधी विधनाबद्दल कारवाईची मागणी केली आहे.

यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,चेतन खुबाणी,माजी नगरसेवक संजय कांबळे,किरण थोरात,विनीत वाडेकर,योगेश वाणी,प्रमोद पाटील सर आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थीत होते.
यावेळी बोलतांना प्रा.सुभाष शिंदे पुढे बोलताना म्हणाले की,”देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झालीत तरी देखील भारतात काही राष्ट्रविरोधी शक्ती या अजून देखील कार्यरत आहेत अशा शक्तीचा मुळापासून बिमोड केला पाहिजे.तरच भारत मातेचे लचके तोडणाऱ्या अंतर्गत व बाह्य शक्तींना चपराक बसेल.
भारतीय सेना व भारतीय पोलीस दल हे करण्यास सक्षम आहे परंतु भारत हा शांतता प्रिय देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही व्यक्ती त्याचा गैरफायदा घेतात.परंतु केंद्रसरकारने आता या देशद्रोही शक्ती विरोधात लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत व आपण सर्व राजकिय पक्षांनी देखील अशा राष्ट्रीय मुद्यावर एकत्र आले पाहिजे.शेवटी अशा घटनेचा निषेध व्यक्त करून तहसीलदार चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close