निवडणूक
आ.दराडे यांना…या शिक्षक संघटनेचा पाठींबा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुक संपल्यावर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना आज कोपरगाव शहरातील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी एकमुखाने विद्यमान मुख्यमंत्री शिंदे गटाचे आ.किशोर दराडे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे व तसे पत्र आज विद्यालयाच्या प्रांगणात सोपवले आहे.

“विद्यमान आ.किशोर दराडे यांनी गत सहा वर्षात नाशिक मतदार संघात शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून शिक्षकांचे अनुदान त्यांचे पेन्शन,वैद्यकीय बिले मिळवून देणे आदीं प्रश्न मार्गी लावले आहे.आगामी काळात वैद्यकीय ब बिले कॅशलेश करणे यासाठी त्यांची मदत लागणार आहे.त्यामुळे शिक्षक संघटना आ.किशोर दराडे यांच्या मागे उभे राहणार आहे”-दिपक बुधवंत,उपाध्यक्ष,शिक्षक संघटना,अ.नगर.
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात २१ उमेदवार आहेत.काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीसमोरील बंडखोरीचे संकट टळले.परंतु भाजपशी संबंधित एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीला बंडखोरीचा तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठ्या राजकीय घडमोडी घडतांना पाहायला मिळत आहे.नाशिक शिक्षक मतदार संघात विद्यमान आ.किशोर दराडे यांचेसह अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेसह,समता पार्टीचे भागवत धोंडिबा गायकवाड यांचेसह एकूण २१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव शहरातील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी विद्यमान आ.किशोर दराडे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.त्यासाठी त्यांनी आ.दराडे यांचे चिरंजीव संकेत दराडे यांचेकडे पाठींब्याचे पत्र सोपवले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात त्यांना पाठिंबा वाढला असल्याचे दिसून येत आहे.
सदर प्रसंगी माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक बुधवंत यांचेसह विविध शिक्षक आणि महिला शिक्षक उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी दिपक बुधवंत यांनी विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी गत सहा वर्षात नाशिक मतदार संघात शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून शिक्षकांचे अनुदान त्यांचे पेन्शन,वैद्यकीय बिले मिळवून देणे आदीं प्रश्न मार्गी लावले आहे.आगामी काळात वैद्यकीय ब बिले कॅशलेश करणे यासाठी त्यांची मदत लागणार आहे.त्यामुळे शिक्षक संघटना आ.किशोर दराडे यांच्या मागे उभे राहणार आहे व त्यांना विजयी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
सदर प्रसंगी संकेत दराडे यांनी हा पाठींबा दिल्याबद्दल शिक्षक संघटनेचे आभार मानले आहे.व त्यांचे प्रश्न आगामी काळात नक्कीच मार्गी लावू असे आ.दराडे यांचे वतीने आश्वासन दिले आहे.