कोपरगाव तालुका
कोपरगाव पालिकेच्या वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नुकताच “ वाचन प्रेरणा ” दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा,या साठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत-मुख्याधिकारी प्रशांत सरोदे
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा,या साठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.तद्वतच डॉ.कलाम यांच्या किमान एका पुस्तकाचे वाचन शिक्षकांनीही करावे,असेही यात अभिप्रेत आहे.या वाचन दिनाचे औचित्य साधून कोपरगाव पालिकेच्या वाचनालयात “वाचन दिन” साजरा करण्यात आला आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने कोपरगांव नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १५ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला आहे.
प्रारंभी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे याचे शुभहस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण दिप प्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी बोलतांना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले की,”कोपरगांव शहरात लवकरच अत्याधुनिक व समृध्द अशी ग्रंथालयाची प्रशस्त इमारत, ई-लायब्ररी,अभ्यासिका केंद्राची लवकरच उभारणी होणार असून वाचनालया मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी ग्रंथालयाचे वाचक नितीन डोंगरे,विजय जोशी,परशुराम साळवे यांना उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले.तर उपस्थितांचे आभार राजेंद्र शेलार यांनी मानले.याप्रसंगी ग्रंथालयाचे वाचक,शहर अभियंता दिगंबर वाघ,श्वेता शिंदे, ऋतुजा पाटील,नितेश मिरीकर,योगेश्वर खैरे,चंद्रकांत साठे,भालचंद्र उंबरजे,सुरेश शिंदे,रामनाथ जाधव,भाऊराव वायखिंडे,अरुण थोरात,बबनराव बढे,प्रशांत चव्हाण,अरुण साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.