जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात निचांकी रुग्ण!

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ४४ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०८ बाधित आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५१हजार ७६६ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ७९९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत सप्ताहात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढत असले तरी शहरी भागात ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.

आज आलेल्या यादीत शहरात निच्चांकी ०१ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात ०७ असे ०८ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण संख्या पाहता रुग्ण संख्या कमी झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले आहे.

आज कोपरगाव शहरी भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे-बैल बाजार रोड येथील एक रुग्णांचा वय-२६ समावेश आहे.

तर ग्रामीण भागात धारणगाव पुरुष वय-८०,करंजी पुरुष वय-२५,तर जेऊर कुंभारी येथील दोन पुरुष वय-३०,५५,तर तीन महिला वय-२५,०६,५० आदी रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ०६७ इतकी झाली आहे.त्यात ८७ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७९ टक्के आहे.आतापर्यंत ११ हजार ६६१ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४६ हजार ६४४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.७२ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १ हजार ९४४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९४.०४ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील बाधित आकडेवारी कमी झाल्यामुळे नागरिकांत समाधान निर्माण झाले आहे. तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Close