कोपरगाव तालुका
उपचाराची साधने जीवित हानी टाळण्यात महत्वपूर्ण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णांत आता वाढीला बऱ्यापैकी लगाम बसला असला तरी आगामी काळात आपल्याला बेसावध राहाता येणार नाही त्यासाठी आधुनिक उपचाराची साधने हि जीवित हानी टाळण्यासाठी मोलाची भूमिका निभावणार असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
यापुढे कोपरगाव तालुक्यातील गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी इतर तालुक्यात जाण्याची वेळ येणार नाही.गंभीर रुग्णांना डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती होण्यासाठी अद्यावत रुग्णवाहिका देखील लवकरच देण्यात येणार आहे-आ.काळे
आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक स्थानिक निधीतून १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर मशीन व २ बायपॅप मशीन,मॉनिटर,२० के.व्ही.जनरेटर सुविधासह युक्त असलेल्या गंभीर कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यांनी परिपूर्ण असलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे आ. काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्मकांत कुदळे,संजय आगवन,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे, अजीज शेख,सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे,राजेश ठोळे,रोहित वाघ,विजय बंब, पालिकेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर,निमाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ.तुषार गलांडे,डॉ.अजमेरे,डॉ. योगेश कोठारी,डॉ.दत्तात्रय मुळे,डॉ.अतिष काळे,युवा शहराध्यक्ष नवाज कुरेशी,फकीर कुरेशी,रमेश गवळी,दिनकर खरे,धरमशेठ बागरेचा,सुनील बोरा,मुकेश ठोळे,अशोक खांबेकर,तुषार पोटे,मनोज कपोते,आदिनाथ ढाकणे,संतोष गंगवाल,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली होती.काही रुग्ण अंत्यवस्थ झाल्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागले होते.त्यामध्ये त्या रुग्णांना मोठा आर्थिक भार सोसावा लागला होता व दुर्दैवाने काही रुग्णांचे निधन देखील झाले होते.मात्र यापुढे गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी इतर तालुक्यात जाण्याची वेळ येणार नाही.गंभीर रुग्णांना डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती होण्यासाठी अद्यावत रुग्णवाहिका देखील लवकरच देण्यात येणार आहे.डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सामान्य व अत्यवस्थ रुग्णांवर तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत.त्यामुळे निश्चीतपणे यापूर्वी वाढलेला मृत्यूदर घटण्यास मदत होणार असून गरजू रुग्णांना आधार दिल्याचे समाधान वाटत असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.