घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती.आज बरोबर दिनांक १३ ऑक्टोबर धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कोरोना साथी मुळे बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत न होता डॉ.आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.

हिंदूदलित समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत असे.त्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराचा निर्णय घेतला.आणि १३ आँक्टोबर १९३५ रोजी येवला या ठिकाणी सभा घेवुन धर्मातराची घोषणा केली.व त्यानंतर १९५६ साली बौद्ध धर्माची दिक्षा घेवुन धर्मातर केले.या पाश्र्वभुमीवर येवला या ठिकाणी दरवर्षी राज्यभरातुन भिमसैनिक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.परंतु या वर्षी कोरोनाचे संकट असताना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील जेउर कुंभारी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण व पंचशील घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी प्रदिप गायकवाड,सुमित पगारे.सागर गायकवाड,अमोल जगताप,साईनाथ गायकवाड,चेतन गायकवाड,विशाल गायकवाड,अनिकेत थोरात,सोमेश्वर गायकवाड,अविनाश पगारे,सचिन गायकवाड,प्रवीण गायकवाड,विजय भालेराव,सुनील जगताप,निखिल दिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.