जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शहीद वलटे यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आमदार आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आज दुपारी १२.१५ वाजता करण्यात आले आहे.

वीर जवान सुनिल वलटे यांनी काश्मीर मध्ये अतिरेक्यांशी लढताना नौशेरा विभागात गत वर्षी वीरमरण आले होते.त्यांच्यावर हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यांचा आज पहिला स्मृती दिना निमित्त पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.

वीर जवान सुनिल वलटे यांनी काश्मीर मध्ये अतिरेक्यांशी लढताना नौशेरा विभागात गत वर्षी वीरमरण आले होते.त्यांच्यावर हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यांचा आज पहिला स्मृती दिन होता.त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन यावेळी आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश आ. काळे यांच्या हस्ते शहीद सुनील वलटे यांच्या कुटूंबियांना प्रदान करण्यात आला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान येथील युवा कार्यकर्ते हर्षद वरकड यांनी औरंगाबाद येथील ब्लड बँकेच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचे सकाळी आयोजन करण्यात आले होते.त्याला युवकांनी चांगला प्रतिसाद देत सुमारे तीस पिशव्या रक्तदान जमा केले आहे.दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी शहीद जवान वलटे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले आहे.यावेळी त्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील वीरमाता व उपस्थित शाहिद जवान वलटे यांचे मराठा बटालियनचे अन्य सहकारी यांचा शाल,हार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,विरपिता रावसाहेब वलटे,वीरमाता सुशीलाताई वलटे,वीरपत्नी मंगल वलटे,भाऊ अनिल वलटे,मुलगा वेदांत वलटे,जगन बागल, अनिल वलटे,अशोक भोकरे,भास्कर वलटे,रावसाहेब आभाळे,गुलाबराव देशमुख,आबा रक्ताटे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Close