कोपरगाव तालुका
पोहेगावात अवैध दारु,शिर्डी पोलिसांचा छापा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दुकानावर दि १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिर्डी पोलासानी टाकलेल्या धाडीत मंगेश नारायण पवार रा पोहेगाव याचा कडे ७८० रुपये किंमतीच्या १५ नग देशी दारूच्या बॉबी संत्रा १८० मि.ली.चा ऐवज सापडला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
अवैध दारू बंद करण्यासाठी सरकारने तीन वर्षांपूर्वी आणखी कडक कायदे केले असले तरी अद्याप त्याचा धसका अवैध दारू उत्पादकांनी घेतलेला वाटत नाही.अन्यथा अवैध दारू निर्मिती आणि विक्री झाली नसती.हा कायदाही या लोकांनी धाब्यावर बसवला असल्याचे ताळेबंदीच्या काळातही अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याचे दिसत आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व रांजणगाव देशमुख या बिट मधील गावे शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोडलेली आहे.या परिसरात अवैध व्यावसायिकांनी आपल्या पथाऱ्या पसरल्याची माहिती काही खबऱ्यानी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांना दिली होती त्याची गंभीर दखल त्यांनी घेऊन त्या परिसरात काल सायंकाळी सहा वाजेच्या धाडी टाकल्या असता त्यानां हा ऐवज सापडला आहे. या खेरीज आनंद उर्फ छोट्या आहिरे रा.पोहेगाव याच्या कडे ८८४ रुपये किंमतीच्या १७ नग देशी संत्रा १८० मि.ली.च्या दारू बाटल्या सापडल्या तर बाबासाहेब चंदन भोजने रा.पोहेगाव याच्या कडे हातभट्टीची २० लिटरची २ हजार रुपये किंमतीची गावठी दारू सापडली आहे.असा एकूण तीन प्रतिबंधात्मक गुन्ह्याचा कारवाया करण्यात आल्या आहेत.तर यातील आनंद उर्फ छोट्या आहिरे हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.तर मंगेश नारायण पवार व बाबासाहेब चंदन भोजने या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री.जाणे हे करत आहे.सदर कारवाईत पोलिस उपनिरीक्षक जाणे, पोलिस नाईक मकासरे,पोलिस नाईक गोडे,पोलिस कॉन्स्टेबल राठोड,यांनी सहकार्य केले आहे.