जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राज्य उत्पादन शुल्काच्या आठ ठिकाणी धाडी,

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर येथील भरारी पथकाने काल दारूबंदी सप्ताह सुरु असतानाही काही ठिकाणी अवैध दारू उत्पादन सुरु असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाल्याने श्रीरामपूर,राहाता व कोपरगाव आदी तालुक्यातील आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीत ०४ लाख ८२ हजार रुपयांचे अवैध १५ हजार ०२० लिटरची अवैध दारू,२६५ लिटर अवैध दारू,एक रिक्षा,एक दुचाकी असा ऐवज जप्त करून पंधरा गुन्हे दाखल केल्याने श्रीरामपूर,राहाता,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दारू उत्पन्न शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईने अवैध दारू उत्पादन करणाऱ्या घटकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान या पुढेही अशाच कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिला आहे.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती सप्ताह पाळण्याबाबत सर्व सरकारी कार्यालयांना दरवर्षी सूचना दिल्या जातात.राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वतीने या सप्ताहदरम्यान राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वतीने दारूबंदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.शासनाला संपूर्ण दारूबंदी नको असल्याने अवैधरीत्या दारू विक्रेते आणि निर्मात्यांवर कारवाई करण्यापुरती ही मोहीम मर्यादित असल्याचे दिसून येत असते.हा कार्यक्रम व्यसनमुक्ती कार्यक्रमाचाच भाग असून कार्यालयाच्या कामानुसार त्याचे दारूबंदी सप्ताह असे नाव बदलण्यात आहे.०२ ते ०८ ऑक्टोबरपर्यंत व्यसनमुक्ती तर ११ ते २८ ऑक्टोबर पर्यंत दारूबंदी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यक्रम होतात.शासनाला कायदेशिररीत्या जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्याचे काम हा विभाग करतो.अवैध दारूमुळे अनेकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.यामुळे मद्य प्राशन करणारांनी शासनमान्य दारूच प्राशन करावी असे आवाहन या कार्यक्रमांद्वारे केले जाते.मात्र बऱ्याच वेळा या कार्यक्रमाचे सोपस्कार पाडले जातात असाच सार्वत्रिक अनुभव असतो.मात्र काल या विरुध्द अनुभव श्रीरामपूर,राहाता,कोपरगाव तालुक्यातील नागरीकांना आला असून त्यांनी अवैध दारू उत्पादकांच्या विरुद्ध आपला मोर्चा वळवला आहे.काल त्याना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी टाकलेल्या धाडीत श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी वस्ती,कदम वस्ती, दत्तनगर आदी ठिकाणी तर राहाता तालुक्यातील नांदूर,ममदापुर,फुलफगार मळा आदी तीन ठिकाणी तर कोपरगाव तालुक्यात कोकमठाण,खडकी,कोपरगाव आदी दोन ठिकाणी अशा एकूण आठ टाकलेल्या धाडीत एकूण ०४ लाख ८२ हजार रुपयांचे १५ हजार ०२० लिटरची अवैध दारू,२६५ लिटर अवैध दारू,एक रिक्षा,एक दुचाकी असा ऐवज जप्त करून पंधरा गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सदरची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क अहमदनगरचे पोलीस निरीक्षक संजय पाटील,श्रीरामपूर भरारी पथक क्रं.०२,विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील,संजय कोल्हे,संजय सराफ,अण्णासाहेब बनकर,बी.बी.हुलगे,बी.टी.घोरतळे,दुय्यम निरीक्षक पी.बी.अहिरराव,के.यू.क्षेत्रे,ए.पी.बडदे,डी.वाय.गोलेकर, एम.दि.कोंडे,परते,वर्षा घोडे,नम्रता वाघ,श्री चांदेकर,श्री.ठोकळ,खेताडे,श्री खेताडे,खाडे,जवान एस.आर.वाघ,एम.एस.मुजमुले,एन.एस.उके,संजय साठे,उत्तम काळे,कांबळे,दु.नीं.गारळे,दु,नीं वामने,महिला जवान व्ही.एस.जाधव,के.बी.लहारे.विद्या आव्हाड,आदींनी सहभाग घेतला होता.या कारवाईने अवैध दारू उत्पादन करणाऱ्या घटकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान या पुढेही अशाच कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close