निवड
कोपरगावातील…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी विवेक कर्डिले टी.वाय.बी.कॉम याची हिमाचल राज्यातील येथील मनाली येथे झालेल्या राष्ट्रीय ॲडव्हेंचर कामासाठी १० ते १९ नोव्हेंबर या काळात निवड झाली आहे त्याच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर कॅम्पमध्ये महाराष्ट्र,झारखंड,बिहार व ओरिसा हे राज्य सहभागी झाले होते.विवेक कर्डिले आणि महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून १४ स्वयंसेवक सहभागी झाले होते.तर अ,नगर जिल्ह्यातून ३ स्वयंसेवक सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड.संजिव कुलकर्णी,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी अभिनंदन केले आहे.या विद्यार्थ्यास कार्यक्रम अधिकारी प्रो.(डॉ.) बी.एस.गायकवाड,प्रो.(डॉ.) एस.एस.नागरे,प्रो.(डॉ.) एस्.बी.भिंगारदिवे,डॉ.एस.के.बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले होते.