जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ट्रक अपघात,एक इसम ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड या राज्य मार्गावर एका अज्ञात ट्रकने सातभाई फार्म जवळ हिरो कंपनीची दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ सी.एफ.२४१०) दिलेल्या धडकेत बाळासाहेब विठ्ठल कसबे (वय-६०) हे ठार झाले असल्याची फिर्याद रमेश बाळासाहेब कसबे (वय ३०) रा.सावळीविहिर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

वर्तमानात नगर-मनमाड हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.त्यामुळे अनेक जीव हकनाक बळी जात आहे.या मार्गवर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहे.रोजच नवनवे अपघात होता आहे.त्या साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळे झाकून घेतले आहे.वारंवार तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे.त्यामुळे नागरिक व प्रवासी यांच्यात या विभागाबाबत मोठा संताप आहे.

वर्तमानात नगर-मनमाड हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.त्यामुळे अनेक जीव हकनाक बळी जात आहे.या मार्गवर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहे.रोजच नवनवे अपघात होता आहे.त्या साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळे झाकून घेतले आहे.वारंवार तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे.त्यामुळे नागरिक व प्रवासी यांच्यात या विभागाबाबत मोठा संताप आहे.अशीच घटना दि.०९ सप्टेंबर रोजी दुपारी घडल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे.

फिर्यादी रमेश कसबे यांनी आपल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की,”दि.बुधवार दि.०९ सप्टेंबर रोजी आपले वडील त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी घेऊन कोपरगाव कडून शिर्डीकडे दुपारी चार वाजेच्या सुमारास येत असताना त्याना कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत सातभाई फार्म जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिली आहे.अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक फरार झाला आहे.या दुर्घटनेत दुचाकींचे नुकसान झाले आहे.त्यांना जखमी अवस्थेत शिर्डी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं.७३२/२०२० भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ),(ब),१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे पुढील तपास करीत आहेत.फिर्यादीने हि फिर्याद पोष्टाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close