जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“त्या” गुन्ह्यात गोवल्याचा आरोपीचा आरोप

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पढेगाव फाट्या नजीक रस्ता लुटीसाठी थांबलेल्या एक टोळीला पकडल्या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या आरोपींनी संवत्सर येथील आदिवासी तरुण करणं मोरे याचे नाव घेतल्या प्रकरणी या आरोपीने समाज माध्यमांवर स्वतःची मुलाखत स्वतःच प्रकाशित करून आपला “त्या” गुन्हयाशी कुठलाही संबंध नाही आपल्याला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने मुद्दाम आकस धरून गोवले असल्याचा आरोप आरोपी करणं मोरे याने केला असून या बाबत उद्या आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना भेटून निवेदन करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान पळून गेलेल्या इसमाचे या आरोपींना नाव विचारले असता त्यांनी करण मोरे रा.रामवाडी संवत्सर असे सांगितले होते.याच आरोपी तरुणाने हा दावा केला आहे.व आपण अद्याप कुठेही पळून गेलेलो नाही व कोपरगाव,संवत्सर आदी परिसरातच आहे.व आपल्याला मुद्दाम या प्रकरणात गोवले असल्याचा दावा केला आहे.व आपण निर्दोष असून आपल्याला या संकटातून आपली संघटनेचे नेते वाचवतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मुंबई-नागपूर हा रस्ता नादुरुस्त असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन या मार्गावर सातत्याने वाहनांची अडवून काही दरोडेखोर कायम लूटमार करत असतात.मात्र अलीकडील काळात यात कमी आलेली असताना काल रात्री कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरे,व त्यांचे सहकारी पो.हे.कॉ.दिलीप तिकोणे,पोलीस नाईक बाबासाहेब कोरेकर,पो.कॉ.मनोज काटे,प्रकाश नवाळी,आदी कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड या राज्य मार्गावर अधिग्रहित वाहानाने गस्त घालत असताना त्याना रविवार दि.२० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.५४ वाजेच्या सुमारास त्याना पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचा या गस्ती पथकाला दूरध्वनी आला व त्यांनी संवत्सर हद्दीत संवत्सर चौफुलीवरून पुढे असलेल्या पढेगाव फाट्या नजीक ४-५ इसम गाड्या अडवून लूटमार करत असल्याची बातमी देऊन त्या ठिकाणी ताबडतोब खात्री करून घ्यावी असे आदेश दिल्याने या गस्ती पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनीं आपला मोर्चा त्या ठिकाणी वळवला असता त्या ठिकाणी रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाच्या प्रकाश झोतात त्यांना काही लोक दोन दुचाकींजवळ उभे असल्याचे आढळले.त्यांनी आपली गाडी रस्त्याचे बाजूला लावून घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी उभ्या असलेल्या काही इसमानी आरडा-ओरडा करण्यास व आपल्या ताब्यातील गाड्या तर काहींनी पायी पळण्यास कसोशीने सुरुवात केली.त्यांच्या कडील काही हत्यारे रोडवर व इतर ठिकाणी विखरून पडली व त्यानीं पाठलाग करणाऱ्या पोलिसांशी झटापट सुरु केली.त्यांना पोलिसांनी मोठ्या कसोशीने ताब्यात आणले.दरम्यान त्यांच्याकडील सामानाची पंचाच्या साक्षीने झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक ४.३,८.३,लांबीचे चाकू,काळ्या रंगाची तुषार दुशिंग याच्या ताब्यातील बजाज पल्सर दुचाकी (क्रं.एम.एच.१७ वाय.६२८०),नकुल ठाकरे याच्या ताब्यातील एक लाकडी मुठीचा ७.५ इंच लांबीचा कोयता,एक दुसरी काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी (क्रं.एम.एच.१७ बी.पी.३५३४),दोन लाकडी दांडे सुमारे ३० व २८ इंची लांबीचे,एक २८ इंच लांबीचा गज,एक सफेद रंगाचे १३ फूट लांबीचे दोरखंड,असा ८० हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.दरम्यान पळून गेलेल्या इसमाचे या आरोपींना नाव विचारले असता त्यांनी करण मोरे रा.रामवाडी संवत्सर असे सांगितले होते.याच तरुणाने हा दावा केला आहे.व आपण अद्याप कुठेही पळून गेलेलो नाही व कोपरगाव,संवत्सर आदी परिसरातच आहे.व आपल्याला मुद्दाम या प्रकरणात गोवले असल्याचा दावा केला आहे.

या तरुणाने आपला या घटनेशी कुठलाही संबंध नाही आपल्याला यात एका प्रकरणात आपण एक गुन्हा दाखल करून संबंधितास न्याय मिळावा असा आग्रह धरल्याने आपल्याला या प्रकरणात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे एक प्रमुख पोलीस अधिकारी यांनी गोवले असल्याचा दावा फेसबुकवर केला आहे.शिवाय त्याच्या समर्थनार्थ काही संघटना सोमवार दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी ०१ वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी शिर्डी यांना वंचित बहुजन आघाडी,एकलव्य भिल्ल समाज संघटना,एकलव्य सामाजिक प्रतीष्ठाण अहमदनगर,एकलव्य सेना,एकलव्य सामाजिक परीषद महाराष्ट्र अशा अनेक आदिवाशी व सामाजिक संघटना एकञित निवेदन देऊन याप्रश्नी त्यांचे लक्ष वेधून घेणार असल्याचे म्हटले आहे.व हा खोटा गुन्हा मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे या प्रकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close