जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ऊस वाहतूकदारांना आव्हानाला सामोरे जावे लागणार-इशारा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

वर्तमानात गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही आवर्तने मिळाल्यामुळे यावर्षी मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध असला तरी नवीन अडचणी व नवीन आव्हाने उभे ठाकत असतात त्यामुळे या अडचणी सोबतच जागतिक कोरोना साथीचे संकट असल्यामुळे काळजी घ्यावी लागणार असून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीने बदलत्या आव्हानाला सामोरे जावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर ऊस उपलब्ध आहे.व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी आपल्या ट्रक्सची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करून घ्यावी ऊस वाहतूक करतांना अडचणी येणार नाही.कोरोना पार्श्वभूमीवर सर्व ट्रक चालक व मालकांनी काळजी घ्यावी-आ.काळे

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर ची ४९ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा.लिमिटेडची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने सुरक्षिततेच्या दिलेल्या सूचनांचा अवलंब करून नुकतीच कंपनीचे आ.काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक छबुराव आव्हाड,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक विश्वासराव आहेर,ज्ञानदेव मांजरे,सुनील शिंदे,काकासाहेब जावळे,कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,गौतम केनचे कार्यकारी संचालक भिकाजी सोनवणे,कारखान्याचे महाव्यवस्थापक सुनील कोल्हे व सभासद सुरक्षित अंतर ठेऊन उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर ऊस उपलब्ध आहे.व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी आपल्या ट्रक्सची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करून घ्यावी ऊस वाहतूक करतांना अडचणी येणार नाही.कोरोना पार्श्वभूमीवर सर्व ट्रक चालक व मालकांनी काळजी घ्यावी.प्रतिबंधक साधने व मुखपट्या आदिंचा वापर करून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवून चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून कंपनीस व शेतकी खात्यास सहकार्य करावे असे आवाहन केले.

सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाव्यवस्थापक सोपानराव डांगे यांनी केले तर आभार संचालक विजय जाधव यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close