जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विवाह करण्यासाठी कोपरगावचे गुरू शुक्राचार्य मंदिर हे अत्यंत योग्य ठिकाण-प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“संजीवनी”मंत्र सिद्धीसाठी कोपरगाव हे भौगोलिक ठिकाण अत्यंत लक्षणीय आढळल्याने त्यांनी या ठिकाणी आश्रम उभारला होता.याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर भावंडे या ठिकाणी काही महिने विसावले होते.एव्हढे हे ठिकाण पवित्र असल्याचे प्रतिपादन गुरू शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले आहे.

गुरू शुक्राचार्य यांनी नंतर शिवाची आराधना करून मृतांना जिवंत करणारी संजीवनी विद्या त्यांनी त्याच्याकडून प्राप्त केली.ह्या विद्येमुळे देवासुरांच्या युद्धात असुरांना नेहमी विजय मिळे.हे लक्षात आल्यावर देवांचे गुरू बृहस्पती ह्यांनी आपला पुत्र कच ह्याला ती विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले.अनेक संकटे सोसून कचाने ती विद्या मिळवली तथापि कचावरील प्रेमाने विव्हल झालेल्या देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या कन्येला विवाहासाठी नकार दिल्यामुळे ‘त्या विद्येचा तुला काहीही उपयोग होणार नाही’असा शाप देवयानीने त्याला दिला.तथापि कचाने ती विद्या आपल्या पित्याला शिकवलेली असल्यामुळे ती सर्व देवांनी आत्मसात केली ते हेच ठिकाण.

कोपरगाव बेट येथील प्रसिद्ध शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीने गुरू शुक्राचार्य यांची वंशवेल,गुरू शुक्राचार्य मंदिर फलक उदघाटन व बाळासाहेब आव्हाड लिखित “शुक्रतीर्थ” या पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड लिखित “शुक्र तीर्थ” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दैत्यांचे आचार्य आणि पुरोहित म्हणून महाभारतात तसेच पुराणांत निर्देशिलेले एक ऋषी. भृगू ऋषी आणि दिव्या (हिरण्यकशिपू ह्या दैत्याची कन्या) ह्यांचे ते पुत्र.त्यांना ‘काव्य’ ह्या अन्य नावानेही संबोधले जाते.देवासुरांच्या संघर्षात अगदी सुरुवातीपासून त्यांनी असुरांची बाजू घेतली होती. बळीराजाने केलेल्या अश्वमेध यज्ञाचे पौरोहित्य शुक्राचार्य करीत होते.त्या वेळी विष्णूने वामनावतार धारण करून बळीराजाकडे तीन पावले जमीन दान म्हणून मागितली.हे दान देण्यातला धोका ओळखून शुक्राचार्यांनी ते न देण्याचा सल्ला बळीराजाला दिला पण त्याने तो न मानल्यामुळे दानाचे उदक सोडण्यासाठी बळीराजाने हाती घेतलेल्या झारीच्या तोटीत शुक्राचार्य शिरले आणि त्यांनी पाण्याची धार अडवून धरली. त्या वेळी बळीराजाने दर्भाच्या टोकाने त्या झारीची तोटी साफ करण्याचा प्रयत्न केला असता, ते टोक शुक्राचार्यांच्या एका डोळ्यात घुसून ते एकाक्ष झाले अशी कथा आहे.

शुक्राचार्य हे अंगिरस् ऋषींचे शिष्य होते पण आपले गुरू शिकवताना पक्षपात करतात, असा अनुभव आल्यामुळे त्यांनी त्यांचे शिष्यत्व सोडून दिले.गुरू शुक्राचार्य यांनी नंतर शिवाची आराधना करून मृतांना जिवंत करणारी संजीवनी विद्या त्यांनी त्याच्याकडून प्राप्त केली.ह्या विद्येमुळे देवासुरांच्या युद्धात असुरांना नेहमी विजय मिळे. हे लक्षात आल्यावर देवांचे गुरू बृहस्पती ह्यांनी आपला पुत्र कच ह्याला ती विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले.अनेक संकटे सोसून कचाने ती विद्या मिळवली तथापि कचावरील प्रेमाने विव्हल झालेल्या देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या कन्येला विवाहासाठी नकार दिल्यामुळे ‘त्या विद्येचा तुला काहीही उपयोग होणार नाही’असा शाप देवयानीने त्याला दिला. तथापि कचाने ती विद्या आपल्या पित्याला शिकवलेली असल्यामुळे ती सर्व देवांनी आत्मसात केली.शुक्राचार्यांनी बार्हस्पत्य-शास्त्र नावाचा एक हजार अध्यायांचा ग्रंथ रचल्याचा निर्देश महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो

या खेरीज कच आणि देवयानी प्रेम या ठिकाणी फुलले ते व कचाने देवगुरु शुक्राचार्य यांचेकडून संजीवनी विद्या प्राप्त केली ते हेच ठिकाण.या ठिकाणी त्यांची समाधी असल्याचे मानले जाते.त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व आहे.या ठिकाणी आता नवनवीन सामाजिक उपक्रम राबवले जात असून त्यांचे उदघाटन मोठ्या उत्साहात आज सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास आज आयोजित केले होते.त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,अड.एस.डी.कुलकर्णी,अड.जी.व्ही.कोऱ्हाळकर,सुहास कुलकर्णी,प्रसाद पर्हे,राजेंद्र आव्हाड,योगेश पाटील,अनिल सोनवणे,सेनेचे माजी शहराध्यक्ष सनी वाघ,हेमंत पटवर्धन,मधुकर साखरे,टिल्लू पठाण,बाळासाहेब गाडे,जोशी,रोडे,मणीलाल उपाध्याय,नरेंद्र आव्हाड,महेंद्र नाईकवाडे,विजय रोहोम,विकास शर्मा,मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,गुरू शुक्राचार्य हे ब्राम्हदेवांचे नातू होते.कोपरगाव या ठिकाणी विविध प्राचीन वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.अन्य ठिकाणी पर्यटन स्थळांचे मोठे आकर्षण असते मात्र कोपरगावातील या प्राचीन वारशाचे जतन व प्रसिद्धी पासून वंचित असल्याचे सांगून विवाह जमविण्यासाठी व विवाह करण्यासाठी या तिर्थ क्षेत्राचा मोठा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन या मंदिर ट्रस्टच्या अधिपत्याखाली सहा मंदिरे आहे.मात्र गुरू शुक्राचार्य हे आकाश,पाताळ,पृथ्वी आदी तिन्ही ठिकाणी असलेली शुक्र नीती ही प्रसिद्ध आहे.ते खगोल शास्त्रज्ञ होते.

सदर प्रसंगी गुरू शुक्राचार्य यांच्यावर आधारित व ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड लिखित “शुक्र तीर्थ” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.त्यावेळी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणारे ओंकार आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन अनिल सोनवणे,सुशांत घोडके,सोनपसारे,आदींनी मार्गदर्शन केले आहे.उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक सुशांत घोडके यांनी केले तर सूत्रसंचलन सचिन परदेशी यांनीं तर उपस्थितांचे आभार एस.एल.कुलकर्णी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close