जाहिरात-9423439946
अपघात

बस अपघात,एक विद्यार्थिनी ठार,एक जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु.कोमल पगारे हिच्या सायकला समोरून येणाऱ्या शालेय बसने जोराची धडक दिली असून त्यात तिच्यासह दोन विद्यार्थी जखमी झाले होते.मात्र उपचारा दरम्यान ती विद्यार्थिनी मृत्यू पावली असून त्याचा भाऊ ऋत्विक पगारे हा जखमी झाला असून त्यावर उपचार सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान यातील बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.मात्र चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

संकल्पित छायाचित्र.

पढेगाव येथील विद्यार्थिनी कोमल नारायण पगारे (वय-१३) तिचा भाऊ ऋत्विक पगारे (वय-११) हे दोघे आपल्या सायकलवर शाळेत जात असताना त्यांना कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर पढेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या फाटकासमोर समोरून येणाऱ्या गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कुलच्या बसने (क्रं.एम.एच.१७ बी.डी.१८०१) जोराची धडक दिली आहे.त्यात फिर्यादीची मुलगी हि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मयत झाली आहे.तर तिचा भाऊ ऋत्विक पगारे हा गंभीर जखमी झाला आहे.

कोपरगाव तालुक्यात रस्त्यांची चाळण झाली असून त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.अशीच घटना आज सकाळी ९.२७ वाजेच्या सुमारास घडली असून यात विद्यार्थिनी कोमल नारायण पगारे (वय-१३) तिचा भाऊ ऋत्विक पगारे (वय-११) हे दोघे आपल्या सायकलवर शाळेत जात असताना त्यांना कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर पढेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या फाटकासमोर समोरून येणाऱ्या गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कुलच्या बसने (क्रं.एम.एच.१७ बी.डी.१८०१) जोराची धडक दिली आहे.त्यात फिर्यादीची मुलगी हि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मयत झाली आहे.तर तिचा भाऊ ऋत्विक पगारे हा गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान या प्रकरणी त्यांनी आरोपी चालक योगेश भाऊसाहेब खिलारी याचे विरुद्ध फिर्यादी नारायण नाना पगारे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३८२/२०२३ भा.द.वि.कलम ३०४ (अ)२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ)(ब) १८७ अन्वये दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close