जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

टपरी धारकांचे पुनर्वसन करा-माजी नगराध्यक्ष पाटील

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत मार्च २०११ मध्ये सुमारे दोन हजार टपरी धारकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अतिक्रमण उठविण्यात आले मात्र अनेक वेळा आश्वासन देऊनही ते कोणत्याही सत्ताधाऱ्याने अद्याप पाळले नाही त्यामुळे हि कुटुंबे उध्वस्त झाली आहे.त्यांना पुन्हा सन्मानाने स्थापित करण्यासाठी त्यानां पुन्हा एकदा खोका शॉप उपलब्ध करून द्या अशी मागणी श्रमीकराज कामगार संघटनेच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना समक्ष भेटून केली आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सन-२०११ पूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती.त्यामुळे नेहमी शहरातील वाहतूक कोंडी होत असे.त्या बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश येऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन प्रांताधिकाऱ्यांच्या कुंदन सोनवणे नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सन-२०११ पूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती.त्यामुळे नेहमी शहरातील वाहतूक कोंडी होत असे.त्या बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश येऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन प्रांताधिकाऱ्यांच्या कुंदन सोनवणे नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली होती.त्यावेळी सुमारे दोन हजारहुन अधिक अतिक्रमणधारकांचे कंबरडे मोडले होते.त्यानंतर अनेक नेत्यांनी आगामी निवडणुका पाहून अनेक आश्वासने देऊन त्यानां आम्ही पुन्हा सन्मानाने गाळे बांधून देऊ असे आश्वासने दिली होती.अनेकांनी बस स्थानका नजीक रांगोळ्या काढल्या होत्या.मात्र ते अद्याप पर्यंत कोणीही पाळले नाही.केवळ नगरपरिषद,विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आम्हीच विस्थापित टपरीधारकांचे तारणहार असल्याचा बहाणा करून आश्वासने देऊन पुन्हा निवडणुका झाल्या की त्यानां वाऱ्यावर सोडून देण्यात आले होते.मात्र हा प्रश्न अद्यापही कोणी निस्वार्थ भावनेने सोडवला नाही व टपरी धारकांना न्याय दिला नाही.अनेक जण परागंदा झाले आहे.अनेकांना आपले कर्ज फेडण्यासाठी घरेदारे विकावी लागली आहे.अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले,त्यांच्या मुलांचे शिक्षण करता आले नाही.बँकांचे हप्ते भरता आले नाही.आज पुन्हा हा प्रश्न श्रमिकराज संघटनेने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित करण्यात आला आहे.व नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन टपरी धारकांचे पुनर्वसन करून त्याना रोजी रोटी निर्माण करण्याचे काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी श्रमीकराज संघटनेचे अध्यक्ष अजय विघे,संघटक राहुल धिवर,सचिव गणपत पवार आदी उपस्थित होते.त्यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आगामी विशेष सर्वसाधारण सभेत हा विषय घेऊन तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासित केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close