कोपरगाव तालुका
गणेश विसर्जन श्रद्धापूर्वकच-नगराध्यक्ष वहाडणे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद,पोलीस विभाग यांनी गणेश भक्तांच्या सहकार्याने अतिशय परिश्रमपूर्वक नियोजनबद्ध रितींने गणेश विसर्जन केले असतानाही काही असामाजिक तत्त्वांनी पालिकेला बदनाम करणासाठी चुकीचे व असंदर्भ चलचित्रण टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून हा प्रयत्न चुकीचा असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी काही नागरिकांनी कोपरगाव नगरपरिषदेकडे श्री गणेशांची मुर्ती न देता परस्पर गोदावरीच्या नदी पात्रात विसर्जन केले.पण आज त्याच मुर्त्या नदीकाठी अस्ताव्यस्त व भग्नावस्थेत पडलेल्या पाहून अतिशय वाईट वाटले.आपण त्या गोळा करून त्याचे विसर्जन केले-आदिनाथ ढाकणे अध्यक्ष,गोदामाई प्रतिष्ठाण
कोपरगाव शहरात नुकताच बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या श्री गणेशाच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी “एक गाव एक गणपती” उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असताना काही असामाजिक तत्त्वांनी शहरात असंबद्ध चलचित्रण सामाजिक संकेतस्थळावर प्रकाशित करून नगरपरिषेदेस बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.त्यावर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी हि प्रतिक्रिया नोंदविली आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्व प्रभागात मूर्ती संकलन करून भक्तिभावाने सर्व विसर्जनही पार पडले आहे.तरीही केवळ वाईट हेतूने आज दिवसभर सामाजिक संकेतस्थळावर वर एक चित्रफीत व संदेश फिरत होता कि,”नगरपरिषदेने मुर्त्या फेकून विटंबना केली.खरे तर नगरपरिषदेचे कर्मचारी विसर्जनासाठी यायच्या आधी कुणी तरी मुर्त्या फेकण्याचा प्रकार केला.मुर्त्या फेकणारे नगरपरिषदेचे कर्मचारी नव्हते हे आवर्जून नमूद केले पाहिजे.तरीही नगरपरिषदेला बदनाम करणाऱ्याना आपण विचारतो कि,”तुम्हाला जर गणेशमुर्त्या फेकून विटंबना झाली असे वाटते तर मग त्याचवेळी मुर्त्या फेकणाऱ्या व्यक्तींना या चित्रफीत करणाऱ्या धार्मिक (?)पुण्यवान इसमाने का रोखले नाही ? तुम्ही तर बदनामी करण्याचा हेतू ठेवून भ्रमणध्वनीवर चित्रण काढण्यात धन्यता मानली हे उघड आहे.खरे तर हा खुलासा करायचा नव्हता कारण मूर्तींची विटंबना होत असताना ते न रोखता चित्रण करणारे “नेभळट” त्या लायकीचेही नाहीत अशी प्रखर टीकाही अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.व शहरातील खऱ्या गणेशभक्तांचा गैरसमज होऊ नये यासाठी आपण हि महिपती प्रसिद्ध केली असल्याचे शेवटी म्हटले आहे.