कोपरगाव तालुका
मयताच्या वारसास धनादेश प्रदान
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार सुभाष पर्वत गाडे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास दोन लाख रुपयांचा धनादेश नुकताच माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांचे वारस यांना देण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील रहिवासी असलेले संस्थेचे कर्जदार सुभाष पर्वत गाडे यांचे अपघाती निधन झाले होते.त्यांच्या निधनानंतर संस्थेने ओरीएनटल ईन्शुरन्स कंपनीकडे आवश्यक त्या सर्व कागद पत्रांची पूर्तता करून मयताच्या वारसाना दोन लाख रुपये रक्कम मिळवून दिले आहे.
कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे अचानक अपघाती निधन झाल्यास त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळून आर्थिक अडचणी निर्माण होतात.अशा कुटुंबाची आर्थिक ओढाताण होवू नये व या कुटुंबाची आर्थिक अडचण दूर होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पद्मविभुषण डॉ. शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या कर्जदारांचे ओरीएनटल ईन्शुरन्स कंपनीकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची जनता व्यक्तिगत दुर्घटना विमा पॉलिसि घेतली आहे.कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील रहिवासी असलेले संस्थेचे कर्जदार सुभाष पर्वत गाडे यांचे अपघाती निधन झाले होते.त्यांच्या निधनानंतर संस्थेने ओरीएनटल ईन्शुरन्स कंपनीकडे आवश्यक त्या सर्व कागद पत्रांची पूर्तता करून मयताच्या वारसाना दोन लाख रुपये रक्कम मिळवून दिले आहे. या दोन लाख रुपये रक्कमेचा धनादेश मयताच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती शारदा सुभाष गाडे यांच्यावतीने त्यांचा मुलगा आशिष सुभाष गाडे यांनी आ. काळे यांच्या हस्ते स्वीकारला आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे,उपाध्यक्ष सोपानराव गुडघे,संचालक गोरक्षनाथ दवंगे,गंगाधर चव्हाण,मॅनेजर बी.डी.काळे,सुभाष बढे,ओरिएंटल इन्शुरन्सचे विभागीय अधिकारी संतोष अग्रवाल,विमा प्रतिनिधी कैलास पांडे,बाबासाहेब गाडे आदी उपस्थित होते.