कोपरगाव तालुका
दुधाला भाववाढ मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दुदुग्ध व्यवसाय वर्तमानात अतिशय बिकट परिस्थितीमधून वाटचाल करीत असून दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गाईच्या दुधाला ३० रुपये दर, प्रती लिटरला १० रुपये अनुदान आणि दूध भुकटीला
प्रती किलो ५० रुपये अनुदान द्यावे अशा मागण्या कोपरगाव तालुक्यातील दूध उत्पादकांनी पोस्टकार्डद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केल्या, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या हस्ते संवत्सर येथे टपाल पेटीत पोस्टकार्ड टाकून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
एकीकडे कोरोना महामारीचे संकट असताना दुसरीकडे कांदा व इतर पिकांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नसल्याने शेती व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीला पुरक म्हणून दूध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडत होते,परंतु तेही आता मिळत नसल्याने दुभती जनावरे सांभळण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना साथीच्या विळख्यात शेतकरी सापडले आहेत.या काळात सर्वात मोठा फटका दूध धंद्याला बसलेला आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळत नसल्याने शेतकरी हैरान झालेले आहेत.गेल्या पाच ते सहा महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे दूध दर वाढवून मिळण्याची मागणी केली जात असतानाही सरकारकडून दखल घेतली जात नाही.या पार्श्वभूमीवर गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांनी टपालाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळण्याची मागणी केली.कोपरगांव तालुक्यातील हजारो दूध उत्पादकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दूध उत्पादकांनी आपापल्या गावातील टपाल कार्यालयात जावून मुख्यमंत्री यांना पोस्टकार्ड पाठवून मागण्या मांडल्या आहेत.
एकीकडे कोरोना महामारीचे संकट असताना दुसरीकडे कांदा व इतर पिकांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नसल्याने शेती व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीला पुरक म्हणून दूध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडत होते,परंतु तेही आता मिळत नसल्याने
दुभती जनावरे सांभळण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.चारा व पशुखाद्याचे दर गगणाला भिडालेले आहेत.परिणामी खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.राज्यस्तरावर दर वाढीबाबत काही तोडगा निघण्याऐवजी राजकारणच अधिक तापले आहे.शेतकरी व
विविध संघटनांनी त्यासाठी आंदोलनेही केली आहेत,परंतु महाविकास आघाडी सरकारला मात्र अजून जाग आलेली नाही.दूध दराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यास्तरावर दोनदा बैठकाही झालेल्या आहेत.मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असा आरोप गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी यावेळी केला.देशात अतिरिक्त दुधाचे उत्पादन होत आहे. महाराष्ट्रात तर अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दूध भुकटीचा पर्याय समोर आला परंतु सद्या दोन लाख टनाहून अधिक भुकटी शिल्लक आहे.दूध भुकटीच्या निर्यातीला सद्या केवळ १० टक्के अनुदान दिले जाते.त्यामध्ये आणखी २० ते २५ टक्के वाढ केल्यास भुकटीची निर्यात चांगल्या प्रकारे वाढून अतिरिक्त दुधाचा प्रश्न सुटण्यास मदत होवू शकते. तसेच गाईच्या दुधाला ३० रुपये दर तर १० रुपये अनुदान मिळाले तरच शेतकरी वाचतील.याचा गांभिर्याने विचार करुन राज्य सरकारने दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशीही मागणी श्री परजणे यांनी यावेळी केली आहे. याप्रसंगी अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.