कोपरगाव तालुका
..या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आर्सेनिक गोळ्या वाटप
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.तुषार गलांडे यांच्या वतीने कोपरगाव शहरात नागरिकांना कोरोना प्रतिबंधक आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
आयुर्वेदाप्रमाणेच होमिओपॅथी वैद्यकीय चिकित्सा पद्धत देखील अनेक वर्ष जुनी आहे. प्रत्येक रुग्णातील लक्षणांनुसार होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत.सी.सी.आर.एच.ने दिलेल्या माहितीनुसार आर्सेनिक अल्बम-३० या औषधामुळे करोनाच्या रुग्णाचा बचाव केला जाऊ शकतो असे थेट म्हटलं जात नाही. यावर आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की,‘केवळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या औषधाचा सल्ला दिला जात आहे.करोना व्हायरसवर अद्याप प्रभावी लस उपलब्ध नाही हे लोकांनी माहिती करून घेणे आवश्यक असताना या गोळ्या वाटप सर्रास होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोना संकटाचा वाढता प्रादुर्भाव व दररोज वाढत असणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्यामुळे माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे होणारे कोणत्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणारे कार्यक्रम आयोजित केले नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी व कार्यकर्त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी येवू नये असे आवाहन करण्यात आले होते. कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या कमी होवून निर्माण झालेलीं साखळी वाढू नये यासाठी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे वतीने नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान कोपरगावात तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चांदेकसारे येथील जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल व आ.आशुतोष काळे मित्र मंडळ यांच्या वतीने चांदेकसारे आरोग्य उपकेंद्र व साई स्वामी हॉस्पीटल,सोनाई हॉस्पीटल येथे पी.पी.ई.किट चे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक गटनेते बोरावके,डॉ.तुषार गलांडे,डॉ.अजय गर्जे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,डॉ.रमेश सोनवणे,भाऊसाहेब भाबड,विकास बेंद्रे,काजल गलांडे,रावसाहेब साठे,राजेंद्र वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.