जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डंपर-दुचाकी अपघात,महावितरणचे तंत्रज्ञ जागीच ठार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते पुणतांबा रस्त्यावर डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल माईल स्टोन या हॉटेलच्या समोर रात्री आठ वाजेच्या समोर रस्त्यावर नादुरुस्त असल्याने हयगईने उभ्या असलेल्या डंपरवर (क्रं.एम.एच.१४ सी.पी.६५३४ ) व मागच्या बाजूने वेगाने कोपरगावच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक-एम.एच.१७ बी.एच.८६६५) आदळून झालेल्या अपघातात गाभनवाडी चंदनापूर ता.संगमनेर येथील दुचाकी स्वार तथा कोपरगाव येथे महावितरण कंपनीत मुख्य तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब सखाराम केदार (वय-५४) हे जागीच ठार झाले आहे.या बाबत संतोष दशरथ पवार (वय-४०) रा.समतानगर शिक्षक कॉलनी यांनी फिर्याद दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

रात्री आठच्या सुमारास आपल्या गावावरून आपल्या कर्तव्यावर जात असताना समोर वरील क्रमांकाचा एक डंपर नादुरुस्त झाला असल्याने रस्त्यावर बाजूला न घेता रस्त्यावरच उभा होता बहुदा समोरून तीव्र प्रकाशाचा झोत असलेले वाहन आले असल्याने मयतास पुढील उभे असलेल्या डंपर या वाहनांचा अंदाज न आल्याने ते जोराने मागील बाजूने कोपरगावकडे जाताना धडकले असावे. त्या अपघातात ते इतके जोराने धडकले की त्यांच्यासह ती दुचाकीच त्या डम्परमध्ये रुतून बसली होती

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत भाऊसाहेब केदार हे महावितरण कंपनीत मुख्य तंत्रज्ञ या पदावर कार्यरत होते ते रात्री आठच्या सुमारास आपल्या गावावरून आपल्या कर्तव्यावर जात असताना समोर वरील क्रमांकाचा एक डंपर नादुरुस्त झाला असल्याने रस्त्यावर बाजूला न घेता रस्त्यावरच उभा होता बहुदा समोरून तीव्र प्रकाशाचा झोत असलेले वाहन आले असल्याने मयतास पुढील उभे असलेल्या डंपर या वाहनांचा अंदाज न आल्याने ते जोराने मागील बाजूने कोपरगावकडे जाताना धडकले असावे. त्या अपघातात ते इतके जोराने धडकले की त्यांच्यासह ती दुचाकीच त्या डम्परमध्ये रुतून बसली होती.त्या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांना बाहेर काढून त्यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्याना तपासणी नंतर त्यांना मृत घोषित केले आहे.मयताच्या पच्छात पत्नी,दोन मुले,दोन मुली,असा परिवार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तर शवविच्छेदना नंतर दुपारी बाराच्या सुमारास त्यांस मयताच्या नातेवाईकांनी आपल्या ताब्यात घेऊन ते आपल्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले असल्याची माहिती माहितगार सुत्रांनी दिली आहे.

या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसानी गु.र.क्रं.५५१/२०२० भा.द.वि.कलम. ३०४ (अ),२८३ मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ अन्वये डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close