जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांसाठी ०५ कोटीं निधी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था हटविण्यासाठी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने ५ कोटी निधी दिला असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“कोपरगाव शहरातील दुरावस्था हटविण्यासाठी कोपरगाव शहराला महाविकास आघाडी सरकारने शहरातील विविध रस्त्यांसाठी ‘विशेष रस्ता अनुदान’ म्हणून ४ कोटी ६५ लाख व वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत ३५ लाख असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजुर केला आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईबाबा संस्थानशी शिर्डी.

कोपरगाव शहरातील खराब व नादुरुस्त रस्ते हे अनेक अपघातांना निमंत्रण देत होते व शहरातील नागरिकांना धुळीने अनेक श्वसन विकारांचा व आजारांचा सामना करावा लागत होता.त्यामुळे कोपरगाव शहर जिल्हाभर या शहराची बदनामी होत होती.शहरात आलेले नागरिक अक्षरशः शहरातील नेतृत्वाला जबाबदार धरून नालस्ती करत होते.तालुक्याची वेगळी अवस्था नव्हती.या नादुरुस्त रस्त्यांमुळे कोपरगाव शहर नेहमी चर्चेत होते.अशा परिस्थितीत आ.आशुतोष काळे हे गत विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.या रस्त्यांचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे होते.मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून शहरातील रस्त्यासाठी निधी आणण्याचे काम सुरु केले होते.त्याला बऱ्यापैकी यश येत आहे.मतदार संघासाठी अडीच वर्षात एक हजार कोटी निधी खेचून आणला असल्याचा त्यांनीं दावा केला आहे.
त्याचाच भाग म्हणून कोपरगाव शहराला महाविकास आघाडी सरकारने शहरातील रस्त्यांसाठी ‘विशेष रस्ता अनुदान’ म्हणून ४ कोटी ६५ लाख व वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत ३५ लाख असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजुर केला आहे.

या निधीतून प्रभाग क्र.१ समतानगर गायकवाड घर ते पाटोळे घर रस्ता डांबरीकरण करणे (१२ लाख), प्रभाग क्र.३ सचिन महाराज घर ते आर.के.इंजिनिअरिंगपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण (१० लाख), प्रभाग क्र.३ हिराबाई लाड घर ते शिंदे घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण (१० लाख), प्रभाग क्र.४ वडांगळे वस्ती ते शेखर रहाणे वस्ती रस्ता डांबरीकरण (१२ लाख), प्रभाग क्र.४ जाकीरभाई घर ते अमोल शर्मा घर डी.पी.रस्ता डांबरीकरण (१२ लाख), प्रभाग, क्र.४ बोरावके वस्ती ते आढाव वस्ती रस्ता डांबरीकरण (१५ लाख), प्रभाग क्र.६ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय बँक रोड डांबरीकरण (३० लाख), प्रभाग क्र.६ ढमाले घर ते अरशी कॉम्प्लेक्स रस्ता कॉंक्रीटीकरण (२० लाख), प्रभाग क्र.६ देवरे घर ते भुसारी घर साईड पट्टीस लादीकरण करणे, प्रभाग क्र.६ संघवी घर ते माळी बोर्डिंग लादीकरण करणे, प्रभाग क्र.६ टिळकनगर शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारील परिसर सुशोभिकरण करणे,प्रभाग क्र.६ जिओ ऑफिस ते संदीप किराणा लादीकरण करणे (२४ लाख), प्रभाग क्र. ८ बाळासाहेब संधान घर ते पठाण घर रस्ता कॉंक्रीटीकरण (२५ लाख),प्रभाग क्र.८ कुरेशी ग्रुप बोर्ड ते चव्हाण घर रस्ता कॉंक्रीटीकरण (३० लाख), प्रभाग क्र.८ कडोसे घर ते संदीप पगारे घर रस्ता कॉंक्रीटीकरण (२० लाख), प्रभाग क्र.९ धारणगाव रोड श्रद्धा टॉवर्स ते सेवा निकेतन रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण (३० लाख), प्रभाग क्र.९ लक्ष्मीनगर भागात अंतर्गत विविध गल्ल्यांमध्ये लादीकरण (३० लाख), प्रभाग क्र.९ इंदिरापथ रोड वरील झवेरी हॉस्पिटल ते डॉ.नरोडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण (२० लाख), प्रभाग क्रमांक ११ अंबिका मेडिकल ते दत्त मदिर रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (२५ लाख), प्रभाग क्र.११ घेगडमल घर ते गायकवाड घर लादीकरण व पुंडे घर ते वैष्णोदेवी मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे (१० लाख), प्रभाग क्र.१२ बबलू दुकळे घर ते जुबेदा आप्पा घर रस्ता कॉंक्रीटीकरण व प्रभाग क्र.१२ दिपक घाटे घर ते फौजिया घर ते मिटकर घर रस्ता कॉंक्रीटीकरण, प्रभाग क्र.१२ तायरा आप्पा घर ते मोहमद शेख घर ते शरीफ शेख घर रस्ता कॉंक्रीटीकरण (१५ लाख), प्रभाग क्र.१४ पाखले घर ते पंढोरे वस्ती रस्ता डांबरीकरण (३० लाख), प्रभाग क्र.१४ गोदावरी नदीवरील छोटा पूल ते बेट डांबरीकरण (३५ लाख), द्वारकानगरी काका कोयटे यांचे घरासमोर सुतार लोहार कार्यालयापासून ते शंकरनगर मध्ये लोहार सर यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण (२० लाख), गवारे नगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डींग ते सिनगर बिल्डींग ते साई यमुना बिल्डींग कॉर्नर ते रॉयल ड्रेम्म सिटी रस्ता डांबरीकरण (२० लाख), गवारे नगर अनवर शेख घर ते कटारे घर रस्ता डांबरीकरण (१० लाख),प्रभाग क्रमांक ९ श्रद्धानगरी परिसरातील सर्वे नं. १५५ उद्यान विकसित करणे (२५ लाख) व प्रभाग क्रमांक १० आचारी हॉस्पिटल जवळील चौक सुशोभिकरण करणे (१० लाख) आदी विकास कामे या ५ कोटी निधीतून होणार आहे अशी माहिती आ. काळे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close