कोपरगाव तालुका
महिलाही सरपंचही ग्रामविकास करू शकतात-ग्वाही
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नागरिकांनी आपल्याला ज्या उद्देशातून सत्तेच्या खुर्चीवर बसविले आहे तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून मिळालेला सत्तेचा उपयोग हा नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच केला पाहिजे हे धामोरीच्या महिला सरपंच जयश्री भाकरे यांनी दाखवून दिले असून विकास करण्याची दुर्दम्य शक्ती असल्यास एक महिला सुद्धा विकासाच्या बाबतीत गावाचा कायापालट करू शकते असे गौरवोदगार कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी धामोरी येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी धामोरी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळून श्री.संत सावता महाराज मंदिराच्या विकासासाठी १० लाख रुपये निधी देवून दिलेला शब्द पाळला आहे. निवडणुकीपुरतेच राजकारण करून दिलेला शब्द पाळण्याचे बाळकडू आपल्याला पूर्वजांकडून मिळाले आहे-आ.आशुतोष काळे
शासनाच्या १४ वित्त आयोगात धामोरी ग्रामपंचायतीच्या वतीने धामोरी येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे अंतर्गत जलशुद्धीकरण (आर.ओ.) प्रकल्प व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे व १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत वेस ते ग्रामपंचायत कार्यालय रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन आ. काळे यांच्या शुभहस्ते आज पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.प. सदस्य सुधाकर दंडवते होते.
यावेळी सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, संचालक ज्ञानदेव मांजरे, माजी संचालक नारायण मांजरे, चंद्रशेखर कुलकर्णी, गौतम बँक संचालक पुंडलिक माळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी,भगवान माळी,शामराव माळी,शिवाजी मांजरे,भास्कर मांजरे, सरपंच जयश्री भाकरे, नारायण भाकरे,बाळासाहेब आहिरे,नितीन पगार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष आहिरे,बाबासाहेब वाणी,पोलीस पाटील संगीता ताजणे,पं.स.अभियंता उत्तमराव पवार, राजेंद्र दिघे, संदेश सातपुते,ग्रामविकास अधिकारी संतोष सोनवणे व आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीपूर्वी धामोरी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळून श्री.संत सावता महाराज मंदिराच्या विकासासाठी १० लाख रुपये निधी देवून दिलेला शब्द पाळला आहे. निवडणुकीपुरतेच राजकारण करून दिलेला शब्द पाळण्याचे बाळकडू आपल्याला आपल्या पूर्वजांकडून कडून मिळाले आहे. यापुढे देखील तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित धामोरी ग्रामस्थांना दिली.