जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उपनगराध्यक्ष निवडणूक ठरवणार आगामी राजकारणाची दिशा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेत विद्यमान उपनगराध्यक्ष योगेश कोणबागुल यांची मुदत ३१ जुलैला संपून जवळपास आठवड्याचा कालावधी उलटला असून नवीन इच्छुक उमेदवारास आपल्या खुर्चीवर बसण्यास घाई झाली असल्याने व त्या बाबत २ महिला,३ पुरुष असे पाच नगरसेवक बाशिंग बांधून बसल्याने भाजप (कोल्हे गट) अस्वस्थ झाला असून या पदावर बसविण्यासाठी विद्यमान उपनगराध्यक्षांवर दबाव वाढला असल्याचे चित्र आहे.त्यामुळे कोपरगाव शहरवासीयांचे आता या पदावर कोण बसणार या कडे लक्ष लागले आहे.

ऑक्टोबर मध्ये संपन्न झालेल्या विधान सभेला कोल्हे गटास मोठा दणका बसून ८२२ मतांचा निसटता पराभव पत्करावा लागल्याने हा पराभव या नेत्यांच्या फारच जिव्हारी लागला आहे.त्यात त्यांना भाजपशी साथसंगत निळवंडे सारखी चांगलीच भोवली आहे.त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची हक्काची मते शहरातून दुरावली आहे.याची चांगलीच जाणीव “दादा”,” वहिनींना” झाली आहे.त्यामुळे आता ही मते पुन्हा आपल्याकडे नव्याने वळविण्यासाठी उपनगराध्यक्षांची निवड ही त्यांची मोठी “संधी” मानली जात आहे.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली त्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष जनतेतून निवडण्यात आला त्यावर विजय वहाडणे यांनी मोठ्या मताधिक्याने आपली मोहर उमटवली होती.तर नगरसेवकांच्या २८ जागांपैकी कोल्हे गटास १२ जागा तर शिवसेनेस ८ जागा आशा २० जागा या युतीने पदरात पाडून घेतल्या होत्या तर राष्ट्रवादीस ७ जागा तर एक जागा अपक्षास मिळाली होती.दरम्यान शिवसेनेच्या एका गटास आपल्या सोबत घेण्यात कोल्हे गटास यश मिळाले होते.त्याच बरोबर सेनेचे दोन तुकडे पाडण्यात बऱ्याच वर्षांनी या गटास यश मिळवून मनमांडे वास्तवात आले होते.पहिल्या उपनगराध्यक्ष निवडीत वहाडणे यांना तोंड देण्यासाठी तितक्याच आक्रमक पातळीवर तोंड देण्यासाठी त्यावेळची गरज म्हणून “त्या” वेळी विजयला विजयाचा तोडा देण्यात येऊन विजय वाजे यांची वर्णी लावण्यात आली होती मात्र नंतर हे “अस्त्र”नगराध्यक्ष वहाडणे यांच्यापुढे निष्प्रभ झाल्याचे निष्पन्न झाले मात्र त्या मानाने त्यांनी बरी लढत दिल्याचे मानले जात आहे.त्यामुळे ठरल्याप्रमाणे वाजे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला व त्यांनी तो यशस्वीपणे पार पाडला त्यानंतर एक वर्ष शिवसेनेसाठी देण्याचा अलिखित करार झाला होता त्या प्रमाणे सेनेचे गटनेते योगेश बागुल यांची एक वर्षासाठी १ ऑगष्ट २०१९ रोजी निवड करण्यात आली होती.व तो कालावधी नुकताच ३१ जुलै रोजी संपला आहे.त्यामुळे त्या जागेवर आपली वर्णी लावण्यासाठी आता कोल्हे गटाच्या इच्छुकांनी संजीवनीचे उंबरठे झिजवण्यास प्रारंभ केला आहे.त्या साठी प्रारंभी या पदावर शड्डू ठोकलेल्या एका पदाधिकाऱ्याने बऱ्यापैकी रान उठवले आहे.व या पदावरील विद्यमान उपनगराध्यक्ष यांनी तातडीने राजीनामा द्यावा या साठी प्रयत्न सुरू केले आहे.त्यासाठी “मोठे दादा”आणि “वहिनी”यांनी निर्णायक भूमिका घ्यावी या साठी बऱ्याच उठाठेवी सुरू आहेत.ठरल्याप्रमाणे सेनेस एक वर्ष ठरले होते व त्यांनी “ते”पद आता भोगले आहे.त्यामुळे त्यांनी आता रीतसर राजीनामा द्यायला हवा.असा इच्छुकांचा अट्टाहास आहे.व त्यासाठी त्यांनी “डाव,””प्रतिडाव”आखण्यास प्रारंभ केला आहे.

राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.व कोपरगाव शहरात त्यांना व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांना मानणारा व्यापारी व समर्थक वर्ग मोठा आहे.व शहरात प्रारंभीच सांगितल्या प्रमाणे पराभूत झालेल्या आमदारांना अपेक्षित मते मिळाली नाही.याला ही मंडळी जबाबदार आहे असा पराभूतांचा समज (!) आहे.त्यामुळे ते आता या बाबत बेरीज करतात की वजाबाकी हाही विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.

मात्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना एक वर्षाच्या कालखंडात केवळ ऑगष्ट ते फेब्रुवारी असे केवळ सात महिन्यांचाच कालखंड उपभोगण्यास मिळाला आहे.त्यात उपनगराध्यक्ष यांचे आसन आणि दालन बनविण्यातच निम्मा वेळ खर्ची पडला आहे.उर्वरित कालखंडात मार्च महिन्यात चीन निर्मित कोरोना साथीचा राक्षस येऊन ठेपल्यामुळे खुर्चीवरही बसता आले नाही.त्यामुळे अजून किमान सहा महिन्यांचा कालखंड सेनेस हवा असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यामुळे ते वेळेवर राजीनामा देतील की नाही या बाबत शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे इच्छुकांनी आताच देव पाण्यात बुडवून ठेवण्यास प्रारंभ केला आहे.कारण कोल्हे गटास अजून सव्वा वर्षाच्या कालखंडात दोघांना उपनगराध्यक्ष पदाचे बाशिंग बांधायचे निर्धारित लक्ष आहे.त्यामुळे बागुल यांनी वेळेवर राजीनामा दिला नाही तर आणखी एकाचा कालखंड वाया जाण्याचा धोका पुढे वाढून ठेवला आहे.त्यामुळे आता ही राजकीय कोंडी वरिष्ठ नेते कशी फोडतात ? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.दरम्यान गत वर्षी ऑक्टोबर मध्ये संपन्न झालेल्या विधान सभेला कोल्हे गटास मोठा दणका बसून ८२२ मतांचा निसटता पराभव पत्करावा लागल्याने हा पराभव या नेत्यांच्या फारच जिव्हारी लागला आहे.त्यात त्यांना भाजपशी साथसंगत निळवंडे सारखी चांगलीच भोवली आहे.त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची हक्काची मते शहरातून दुरावली आहे.याची चांगलीच जाणीव “दादा”,” वहिनींना” झाली आहे.त्यामुळे आता ही मते पुन्हा आपल्याकडे नव्याने वळविण्यासाठी उपनगराध्यक्षांची निवड ही त्यांची मोठी “संधी” मानली जात आहे.त्यातून त्यांचे पुन्हा प्रतिमा मंडन होणार आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही की त्यासाठी कोणा ज्योतिषाची गरजही नाही.आता पुन्हा नव्याने आपले प्रतिमा मंडन करताना अल्पसंख्याक नगरसेवकाकडे त्यांचे बारीक लक्ष राहणार ही बाब ओघाने आलीच. त्यातच माजी नगरसेवक स्व.करीमभाई कुरेशी यांचे काही महिन्यांपूर्वी दुःखद निधन झाले आहे त्यातून त्या कुटुंबाप्रती स्नेह दाखविण्याची ही नामी संधी आहे.ती अर्थातच ते दवडणार नाही हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.त्यामुळे इच्छुकांत अग्रक्रमाने समाजाची मते वळवणे हे आव्हान असल्याचे मानून कोल्हे गट विधानसभेत दुरावलेले मते पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य देण्याची दाट शक्यता असल्याने या पदावर नगरसेवक अरीफ कुरेशी यांचे घोडे सर्वांत पुढे राहण्याची दाट शक्यता आहे.नाही तरी अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण “हा” या नेत्यांचा आपल्या जीवनातील आवडता खेळ असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहेच.त्या पाठोपाठ त्यांचा हुकुमाचा एक्का म्हणून ते माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या धर्मपत्नी विद्या सोनवणे यांचे नाव येऊ शकते.शहरात कमी पडलेली मते ही कोल्हे गटाची दुखरी नस असल्याने ती सावरण्याचे मोठे आव्हान आहे.बऱ्या म्हटल्या जाणाऱ्या पदासाठी बहुसंख्याक समाज या नेत्यांची बऱ्याच वेळा नापसंती असतो असा इतिहास आहे.व त्यांचा त्यावर विश्वास नसतो मात्र “तो” दाखविण्याचा “नाटकीपणा” ते वरवर दाखवत असतात.त्याला कोपरगाव शहराचे राजकारण अपवाद नाही.त्यामुळे या समाजातील इच्छुकांनी या पदासाठी फार “टाचा” वर करू नये हे उत्तम.त्यामुळे नगरसेवक जनार्दन कदम,मंगल आढाव,स्वप्नील निखाडे यांचा या पदासाठी नंबर लागेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.एखाद्या पदासाठी इच्छुक असणे व पदासाठी महत्वाकांक्षी असणे वाईट नाही मात्र त्यासाठी वेळ येणे ही बाब बऱ्याच वेळेस त्या-त्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असते.व त्यासाठी प्रतीक्षा,निष्ठा व संयम राखणे,ही मोठी तपस्या ठरत असते जो यात पास होतो तो यशस्वी ठरतो.आता या पातळीवर नगरसेवक जनार्दन कदम किती खरे उतरतात हे महत्वाचे ठरणार आहे.कारण ते राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.व कोपरगाव शहरात त्यांना व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांना मानणारा व्यापारी व समर्थक वर्ग मोठा आहे.व शहरात प्रारंभीच सांगितल्या प्रमाणे पराभूत झालेल्या आमदारांना अपेक्षित मते मिळाली नाही.याला ही मंडळी जबाबदार आहे असा पराभूतांचा समज (!)आहे.त्यामुळे ते आता या बाबत बेरीज करतात की वजाबाकी हाही विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.कारण आगामी काळात अल्पसंख्यांक समाज व कोयटे-कुदळे समीकरण निर्णायक ठरणार आहे हे न समजण्या इतकी ही राजकीय मंडळी दुधखुळी नाही.त्यामुळे आगामी उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक “अरीफ कुरेशी” व “जनार्दन कदम” ही समीकरणे आगामी राजकीय व्यासपीठावर जवळची ठरतात.त्यामुळे त्यांना आळीपाळीने ही संधी मिळू शकते ही शक्यता जवळची ठरते.

विद्यमान उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी आपला राजीनामा वेळेत देणे ही बाब नेमकी वेळ साधणारी आहे.कारण आगामी काळात या कोल्हे गटास मिळालेल्या सेना गटास दुखावणे ही बाब वाटते इतकी लगेच सोपी नाही.सेनेची फुटकळ करण्यात यश मिळाले तरी “ती”संपवण्यात अद्याप यश आले असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल.व त्यांना दुखावणे कदाचित दुभंगलेल्या सेनेला पुन्हा एकत्र येण्यासाठी निमित्त ठरू शकते हे अचूक वेळ साधणे हे काम तसे कठीणच मानलें पाहिजे.ते ही ईशान्य गडावरील वर्तमानातील नेते मंडळी कसे पार पाडतात हे ही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

मात्र त्या आधी विद्यमान उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी आपला राजीनामा वेळेत देणे ही बाब नेमकी वेळ साधणारी आहे.कारण आगामी काळात या कोल्हे गटास मिळालेल्या सेना गटास दुखावणे ही बाब वाटते इतकी लगेच सोपी नाही.सेनेची फुटकळ करण्यात यश मिळाले तरी “ती”संपवण्यात अद्याप यश आले असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल.व त्यांना दुखावणे कदाचित दुभंगलेल्या सेनेला पुन्हा एकत्र येण्यासाठी निमित्त ठरू शकते हे अचूक वेळ साधणे हे काम तसे कठीणच मानलें पाहिजे.ते ही ईशान्य गडावरील वर्तमानातील नेते मंडळी कसे पार पाडतात हे ही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.कारण आता त्यांच्या कडे आता आपल्या ठेवणीतील “अस्त्र”म्हणून गणले गेलेले व साडेतीन दशके वेगवेगळे डावपेच लढवलेले नेतृत्व माजी मंत्री शंकरराव कोल्हे आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे गलीतगात्र झाले आहे.म्हणून हा वर्तमान नेत्यांसाठी संक्रमण काळ मानला पाहिजे.व म्हणूनच तो निर्णायक ठरतो.तसा तो ऑक्टोबर विधानसभा निडणुकीत सपशेल “अपयशी” ठरला आहे ही बाब या पातळीवर ठसठशीत उठून दिसते त्यामुळे त्यांना प्रत्येक पाउल विचारपूर्वक टाकावे लागणार हे ओघाने आलेच.त्यामुळे ही निवडणूक त्यांची आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी आहे इतकेच या निमित्ताने म्हणता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close