जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात शेतकरी सोडले वाऱ्यावर !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपल्या कष्टाने शेतमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्याला आपला शेतमाल विक्री करण्यासाठी हक्काची जागा निर्माण करून देण्यात राजकीय नेते आणि प्रशासन कमी पडले असल्याचे दुर्दैवाने उघड झाले असून या बाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांचा सन्मान करावा अशी मागणी कोपरगाव शहर मनसेने नुकतीच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव परशराम सिंनगर यांचे कडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी त्यांना महानगरांमध्ये आपला माल विक्रीस सरकारने परवानगी दिली असताना कोपरगावातील शेतकरी नेते,प्रशासन मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यास अपुरे पडत आहे.आता जवळपास कुठलीही निवडणूक नसल्याने शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही.दिल्लीतून ई-शेतमाल विक्रीच्या गप्पा सुरु असताना कोपरगावात त्याचे वास्तव स्वरूप पाहायला मिळत आहे.राज्यातील बाजार समित्या शेतमाल विक्रीसाठी निर्माण केलेली व्यवस्था असतानाही ती शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी ती व्यापारी धार्जिनी बनली आहे.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.

कोपरगाव शहरात नागरपरिषदने नुकतेच बाजार ओटे बांधून पूर्ण केले आहे.मात्र त्याठिकाणी केवळ व्यापाऱ्यांनाच परवानगी दिली आहे व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना बाजार समितीकडे सोपवले आहे.तर कोपरगाव बाजार समिती म्हणजे,”असून अडचण आणि नसून खोळंबा” ठरत आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी त्यांना महानगरांमध्ये आपला माल विक्रीस सरकारने परवानगी दिली असताना कोपरगावातील शेतकरी नेते,प्रशासन मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यास अपुरे पडत आहे.आता जवळपास कुठलीही निवडणूक नसल्याने शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही.राज्यातील बाजार समित्या शेतमाल विक्रीसाठी निर्माण केलेली व्यवस्था असतानाही ती शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी ती व्यापारी धार्जिनी बनली आहे.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.त्याना शेतकऱ्यांच्या हिताचे देणे घेणे असल्याचे त्यांच्या वर्तनावरून तरी दिसत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल सध्या कुत्रे खात नाही.चप्पल-बुट विक्रीसाठी साठी काचेचे देव्हारे,आणि बाजार ओटे हागणदारीत तर नागरिकांना खाण्यासाठी निर्माण केलला भाजीपाला विक्री गटारीजवळ अशी व्यवस्था हे आजचे दुर्दैवी वास्तव आज कोपरंगावसह राज्यात निर्माण झाले आहे.त्यांना जनावरांच्या बाजारात बसण्यास मजबूर करून आम्ही तुम्हाला काय किमंत देतो हेच सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.शेजारी मोठी गटार,तेथे जनावरांचे उकिरडे असलेल्या अस्वच्छ जागेत शेतकऱ्यांना बसवून तालुक्यातील नेत्यांनी ते त्यांचे किती शेतकऱ्यांचे कैवारी आहेत हेच दाखवून दिले आहे.या बाबत चकार शब्द बोलायला कोणी तयार नाही.या शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडण्याचे काम मनसेने निदान केले आहे.

त्यांनी बाजार समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”शेतकरी व व्यापारी यांना भाजीपाला खरेदी विक्रीसाठी नेहरु भाजी मार्केट येथे तसेच बाजारतळ येथील राघोजी भाजी मार्केट तयार करुन देखील जागा पुरत नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये अनेकवेळा वाद होतात त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक शेतकऱ्यांना बैलबाजार या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे परंतु तेथे असणाऱ्या जनावरांच्या बाजारामुळे तेथे अस्वछ्ता आहे त्यामुळे नागरिक तेथे खरेदीसाठी येत नाही व शेतकऱ्यांना रोगराईचा सामना करावा लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या ठिकाणी शेतकऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्थीत जागा नसून जनावरे बांधतात तेथे त्यांना जागा दिली आहे.शेणाचा उकिरडा काट्या काढून लवकरात लवकर स्वच्छ करावा व शेतकरी बांधवांसाठी बाजार समितीच्या भिंती लगत ओटे बांधुन द्यावे.रस्त्यावरील व्यक्ती बाजार भाजीपाला घेऊ शकतो व तेथे शेतकरी भाजीपाला मार्केट तयार होवून शेतकरी ते ग्राहक अशी बाजारपेठ तयार होवून जनतेची लुटमार बंद होवू शकते.तेंव्हा शेतकऱ्यांना त्यांची बसण्याची हक्काची जागा ही आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित व स्वच्छ ठिकाणी असावी यासाठी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा मनसे पद्धतीने शेतकरी बांधवांसाठी आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला आहे.सदरचे निवेदन बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले यांना देण्यात आले आहे.

या वेळी बाजार समितिचे संचालक गाढवे,सचिव परसराम शिनगर हे उपस्थीत होते. या निवेदनावर शहराध्यध सतिष काकडे,उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, रघुनाथ मोहिते,बंटी सपकाळ,नितिन त्रिभुवन,आलिम शहा,जावेदभाई,शेख सचिन खैरे,आंनद परदेशी,संजय जाधव,सतीश काकडे,नवनाथ मोहिते आदींच्या सह्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close