जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने आयोजित कोपरगांव फेस्टिव्हलच्या उपक्रम अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,अहमदनगर जिल्हा शाखा,कोपरगांव तालुका प्रेस फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघटना,कापसे पैठणी यांच्या विशेष सहकार्याने दीपावली-पाडव्याची परंपरा असलेल्या घर तेथे रांगोळी स्पर्धेचा सन-२०१८ निकाल कलेचे उच्चपदवीधरांकडून प्राप्त झाला असून खालीलप्रमाणे जाहिर झाला असून यात कोमल खर्डे यांचा प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती परिक्षण समितीच्या प्रा.कल्पना हेमंत गिते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दीपावली-पाडव्या निमित्त सलग सहाव्या वर्षी घर तेथे रांगोळी स्पर्धा पाच प्रकारात घेण्यात आली होती.पारंपारिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)- कोमल खर्डे, विशेष गुणवत्ता रांगोळी(भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)- रक्षा पांडे,रेणुका नाईक,अंकिता कुलकर्णी, पायल लहुरीकर,सुप्रिया गर्जे,दिपाली जाधव,मधुरा आहेर,भारती लोखंडे, पुजा कोटक,सुनिता बिडवे,पुजा मतकर,कावेरी सोसे,गीता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

निसर्गचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) – ममता डागा ,विशेष गुणवत्ता रांगोळी(भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)- अनिता गायकवाड,अनुष्का अहिरे यांना सन्मानित करण्यात येईल.

व्यक्तीचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) – भगवती पटेल, विशेष गुणवत्ता रांगोळी(भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)- राजश्री गुजराथी,धनश्री टोरपे,तंटकताई नागरे,अनुजा बनसोडे, प्रिया वाघमारे,वैष्णवी क्षत्रिय,तेजल पगारे,वैष्णवी पहिलवान,सौंदर्या बनसोड, अनिकेत सोनवणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सामाजिक विषयी रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) – प्रणाली खैरनार,विशेष गुणवत्ता रांगोळी(भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)- तनुश्री वर्मा,श्वेता खांडेकर, शितल पांडे,वैष्णवी टोरपे,नेहा गुजराथी,एस.ए.पवार, श्रेयस रोहम,विकी मनतोडे,कांचन मोरे,दर्शन वढणे,पुजा धुमाळ, आश्विनी पंडोरे यांना सन्मानित करण्यात येईल.

व्यंगचित्राची रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) – दिपु पंजाबी,विशेष गुणवत्ता रांगोळी(भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)- ज्योती कोदे,नेहा साटोटे,पुजा चव्हाण, पल्लवी जाधव,ओमकार सोनवणे यांना सन्मानित करण्यात येईल.

रांगोळी स्पर्धेच्या पाच प्रकारात प्रथम क्रमांक विजेते परिक्षण समितीच्या शिफारसीनुसार पुढील वर्षापासून संयोजन समिती व परिक्षण सहाय्यक सदस्य म्हणून कामकाज पहातील.आणि प्रदर्शनार्थ रांगोळी साकारतील.सर्व बक्षिस विजेत्यांच्या सरकारचा दिनांक,ठिकाण आणि वेळ हे आयोजकांकडून
विजेत्यांना मोबाईल द्वारे कळविण्यात येणार असल्याचे सूर्यतेज संस्थेने जाहीर केले आहे.परीक्षणात प्रा.अनिल अमृतकर,प्रा.मसुदा दारूवाला,प्रा.रश्मी जोशी,प्रा.अतुल कोताडे,प्रा.माधवी पेटकर,प्रा.मेधा अलई यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close