न्यायिक वृत्त
खून प्रकरणी चारही आरोपींना पोलीस कोठडी,कोपरगाव न्यायालयाचा निर्णय

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या,राष्ट्रपती पुरस्कार’ विजेत्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी डाव्या कालव्याच्या लगत रहिवासी असलेल्या आदिवासी वस्तीवर दीपक दादा गांगुर्डे (वय-४०) या इसमाचा खून झाल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अण्णा गायकवाड सह चार आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांनी आज कोपरगाव येथील दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पाटेवाल यांनी चारही आरोपींना आज कोपरगाव येथील वरिष्ठ दिवाणी व फौजदारी न्या.श्रीमती एस.एम.बन्सोड यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीना आगामी १६ सप्टेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पाटेवाल यांनी चारही आरोपींना आज कोपरगाव येथील वरिष्ठ दिवाणी व फौजदारी न्या.श्रीमती एस.एम.बन्सोड यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीना आगामी १६ सप्टेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले फिर्यादी महिला जया दिपक गांगुर्डे हिचा मयत पती दिपक दादा गांगुर्डे याचा दि.११ सप्टेंबर रोजी सांयकाळी ४.४५ वाजता आर्थिक कारणावरून खून झाला होता.सदर घटनेतील मयत इसम हा गवंडी काम करणारा होता.त्याने आरोपी अण्णा गायकवाड यांच्या घराचे काम केले होते त्याच्या मजुरीची रक्कम आरोपींकडे बाकी होती.ती त्याने काल दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी येसगाव येथील कमानीजवळ दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास आरोपींकडे मागितली होती त्याचा त्यांना राग येऊन व त्यातून बाचाबाची झाली होती.त्यात आरोपी अण्णा गायकवाड याने फावड्याच्या दांड्याने व दगडाने मारहाण केली त्यात आरोपी मयत झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यास अन्य तीन आरोपी उषा सुनील पोळ,स्नेहा सुनील पोळ,राज सुनील पोळ,आदींनी साहाय्य केले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती.त्यामुळे येसगावसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान यातील पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने हालचाल करून प्रमुख आरोपी अण्णा गायकवाड यांचेसह अन्य तीन आरोपी उषा सुनील पोळ,स्नेहा सुनील पोळ,राज सुनील पोळ आदींना
काही तासात रातोरात अटक केले होती.
दरम्यान या आरोपींना आज पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पाटेवाल यांनी कोपरगाव येथील वरिष्ठ दिवाणी व फौजदारी न्या.श्रीमती एस.एम.बन्सोड यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीना आगामी १६ सप्टेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे पोलिसांच्या या करवाईचे कोतुक होत आहे.