जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रभाग दोन मधील प्रलंबित कामे त्वरित करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये विद्यानगर,आढाव वस्ती,बँक कॉलनी या भागातील डांबरीकरण व महादेव मंदिर परिसरातील पेव्हिंग ब्लॉक,भुयारी गटारी आदींची काय तातडीने करावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक व माजी बांधकाम सभापती जनार्दन कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन केली आहे.

कोपरगाव नगर परिषद निवडणूक होऊन जवळपास चार वर्षाचा कालखंड उलटत आला आहे.या प्रभागात जनविकासाची अनेक प्रलंबित कामे असून त्यात विद्यानगर,आढाव वस्ती,बँक कॉलनी या भागातील डांबरीकरण व महादेव मंदिर परिसरातील पेव्हिंग ब्लॉक,भुयारी गटारी बनवणे आदी बाबत आपण व आपले सहकारी नगरसेवक यांनी वारंवार मागण्या केल्या आहेत.मात्र त्याकडे अद्याप नगरपरिषदेने लक्ष दिले नाही-जनार्दन कदम-नगरसेवक, कोपरगाव नगर परिषद

कोपरगाव नगर परिषद निवडणूक होऊन जवळपास चार वर्षाचा कालखंड उलटत आला आहे.या प्रभागात जनविकासाची अनेक प्रलंबित कामे असून त्यात विद्यानगर,आढाव वस्ती,बँक कॉलनी या भागातील डांबरीकरण व महादेव मंदिर परिसरातील पेव्हिंग ब्लॉक,भुयारी गटारी बनवणे आदी बाबत आपण व आपले सहकारी नगरसेवक यांनी वारंवार मागण्या केल्या आहेत.मात्र त्याकडे अद्याप नगरपरिषदेने लक्ष दिले नाही.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.या प्रलंबित कामामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या तीव्र होऊ शकतात अथवा रोगराई पसरू शकते असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.या पूर्वी आपण बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांना भेटलो आहे.त्यांनी स्वातंत्र्य दिना पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे असेही आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या मागण्याचे निवेदन देताना वैभव गिरमे,नगरसेविका दीपा गिरमे,विष्णुपंत गायकवाड,प्रताप जोशी,अमोल राजूरकर,विजय बोथरा,दशरथ सारवाण,हेमंत वैरागळ,योगेश उदावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close