जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोनदा फवारणीची आवश्यकता-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पावसाळ्यात सूक्ष्म जीवजंतूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊन अनेक साथी निर्माण होण्याचा धोका असल्याने कोपरगाव नगरपरिषद हद्दीत पावसाळ्यात दोनदा फवारणी करणे आवश्यक असून या फवारण्या वेळेत पूर्ण कराव्या अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने संपूर्ण शहरात दि.२७ मार्च पासून सोडियम हायपोक्लोराईडच्या चार वेळा फवारण्या पुर्ण केल्या “नियोन”ची एक फवारणी,एक धुर फवारणी अशा सहा फवारण्या पुर्ण झालेल्या आहेत.पुन्हा धुर फवारणीची ऑर्डर दि.२६ जून रोजी दिलेली आहे,परंतु पाऊस सूरु असल्याने फवारणी थांबविली होती.”नियोन”ची फवारणी हनुमान नगर,साईनगर,इंदिरानगर या भागात सुरू आहे.ज्यांना फवारणीची माहिती हवी आहे त्यांनी नगरपरिषद कार्यालयात भेटावे.वृत्तपत्रातील बातम्यांमुळे नागरिकांचा गैरसमज होऊ शकतो -विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

एकाच गावात किंवा शहरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात.एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत.पण वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले.साथीचे रोग बहुधा त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात.डासांमुळे,कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात. किंवा आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या दुसरी व्यक्तीला आणि तिच्याकडून इतरांना आजार संभवतो.अशा प्रकारे आजाराचे रुग्ण वाढत जातात.सामान्यपणे होणाऱ्या अशा साथीच्या आजारांची ही जंत्री इन्फ्ल्युएन्झा,कांजिण्या,चिकुनगुनिया,टायफॉईड,डांग्या खोकला,डेंग्यू (डेंगी) आदी प्रकारचे आजार पावसाळ्यात बाळावण्याचा धोका असल्याने कोपरगाव पालिकेच्या आरोग्य विभागाने या बाबत तातडीची कारवाई करणे अपेक्षित असल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.वर्तमानात साथीच्या रोगाचा प्रताप पूर्ण जग पाहत असून कोरोंना साथीची व्याप्ती किती मोठी आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.या पार्श्वभूमीवर हि फवारणी होणे आवश्यक आहे.मात्र पालिका टाळाटाळ करीत आहे.त्यामुळे नागरिकांना अनावश्यक दवाखान्याचे खर्च वाढू शकतात वर्तमानात कोरोनाचा कहर मोठा असल्याने खरे तर या फवारण्या जास्त होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.व या फवारण्या किमान दोनदा करण्याची गरज माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रतिपादन केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close