जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अल्पवयीन मुलीस पळविले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या इंदिरानगर या उपनगरात रहिवाशी असलेल्या आपल्या अल्पवयीन नातीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेण्यात आल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या आजीने (वय-६५) दाखल केल्याने टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात टाकळी ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार महिला या आपल्या कुटुंबिया सोबत राहते.त्यांना एक नातं असून ती अल्पवयीन आहे.मंगळवार दि.७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तक्रारदार महिलेची (वय-६५) या महिलेची नात एकाएकी काही न सांगता बाहेर गेली असून तिचा शोध नजीकच्या नातेवाईकांकडे घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे आज सायंकाळी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असते की, कोपरगाव तालुक्यात टाकळी ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार महिला या आपल्या कुटुंबिया सोबत राहते.त्यांना एक नातं असून ती अल्पवयीन आहे.मंगळवार दि.७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तक्रारदार महिलेची (वय-६५) या महिलेची नात एकाएकी काही न सांगता बाहेर गेली असून तिचा शोध नजीकच्या नातेवाईकांकडे घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे आज सायंकाळी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली असून या मुलीचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.

या बाबत कोपरगाव शहर पोलिसानी गु.र.नं.२५२/२०२० भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close