जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात कुऱ्हाडीने मारहाण,दोन गंभीर जखमी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असलेले इंदिरानगर येथे फिर्यादीच्या मुलास रस्त्यात अडवून शिवीगाळ करून घरासमोर जाऊन फिर्यादीच्या मुलास कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा गुन्हा आरोपी ऋषिकेश गणपत पवार व अभिषेक गणपत पवार या दोघा भावावर फिर्यादी गणपत अशोक दळे यांनी दाखल केली असून या घटनेत फिर्यादी व त्यांचा मुलगा अजय दळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

कोपरगाव शहरात इंदिरा नगर या परिसरात फिर्यादी गणपत दळे व त्यांचा मुलगा व अन्य कुटुंबीय व आरोपी ऋषिकेश पवार यांचे कुटूंबीय राहतात.या दोघात अचानक रविवार दि.पाच जुलै रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुरबुरी झाल्या आहेत.त्यात फिर्यादीच्या म्हणण्यानुसार व दाखल फिर्यादीनुसार यातील आरोपी ऋषिकेश पवार व अभिषेक पवार यांनी संगनमत करून फिर्यादीचा मुलगा अजय गणपत दळे यास रस्त्यात अडवून त्याला शिवीगाळ केली व नंतर फिर्यादीच्या घरासमोर जाऊन फिर्यादीच्या मुलास कुऱ्हाडीने मारहाण केली आहे.कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात इंदिरा नगर या परिसरात फिर्यादी गणपत दळे व त्यांचा मुलगा व अन्य कुटुंबीय व आरोपी ऋषिकेश पवार यांचे कुटूंबीय राहतात.या दोघात अचानक रविवार दि.पाच जुलै रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुरबुरी झाल्या आहेत.त्यात फिर्यादीच्या म्हणण्यानुसार व दाखल फिर्यादीनुसार यातील आरोपी ऋषिकेश पवार व अभिषेक पवार यांनी संगनमत करून फिर्यादीचा मुलगा अजय गणपत दळे यास रस्त्यात अडवून त्याला शिवीगाळ केली व नंतर फिर्यादीच्या घरासमोर जाऊन फिर्यादीच्या मुलास कुऱ्हाडीने मारहाण केली आहे.याखेरीज फिर्यादी गणपत दळे यांच्या घराचा दरवाजा व विजेचे मीटर यांची तोडफोड करून बरेच नुकसान केल्याचे म्हटले आहे.मात्र भांडणाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२४७/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३४१,४२७,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी ऋषिकेश पवार व अभिषेक पवार या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close