जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एकाचा खून,दोघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन की.मी.अंतरावर असलेल्या रेणूकनगर ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या बांधकामावर काल सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पश्चिम बंगाल मधील मजुरांमध्ये आपापसात वाद होऊन त्या वादाचे रूपांतर भांडणात होऊन यात आरोपी राहुल राजव्यापारी मोंडल,रा.माजेग्राम राणाघाट,नदिया व सुकल मंगला हेमब्राम,रा.छोरा कॉलनी.छोरा हटला,छोरा बर्धमान बमन बाग्राम दोघे पश्चिम बंगाल यांनी सानू निमाई बिश्वास (वय-२५) यांस गंभीर जखमी करून ठार मारले असल्याची फिर्याद दिगंबर ज्ञानदेव होगे (वय-५२)धंदा मजुरी रा.शिंगी-शिंदे नगर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन की.मी.अंतरावर रेणुकानगर परिसरात ख्रिश्चन मिशनरी शाळेचे बांधकाम सुरु असून या कामावर पश्चिम बंगाल येथील मजूर मोठ्या संख्येने कामावर आहेत.सध्या कोरोनाची बांधकामावरील टाळेबंदी उठल्याने या ठिकाणी पश्चिम बंगाल येथील मजुरांची आपले बांधकाम वेगाने सुरु केले आहे.दरम्यान काल ६ जुलै रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास या मजुरांचा अज्ञात कारणाने वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले त्या घटनेतील दोन आरोपीनीं अज्ञात कारणावरून सानू बिश्वास याचा लाकडी दांडक्याने वार करून खून केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन की.मी.अंतरावर रेणुकानगर परिसरात ख्रिश्चन मिशनरी शाळेचे बांधकाम सुरु असून या कामावर पश्चिम बंगाल येथील मजूर मोठ्या संख्येने कामावर आहेत.सध्या कोरोनाची बांधकामावरील टाळेबंदी उठल्याने या ठिकाणी पश्चिम बंगाल येथील मजुरांची आपले बांधकाम वेगाने सुरु केले आहे.दरम्यान काल ६ जुलै रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास या मजुरांचा अज्ञात कारणाने वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले त्या घटनेतील दोन आरोपी राहुल राजव्यापारी मोंडल,रा.माजेग्राम राणाघाट,नदिया व सुकल मंगला हेमब्राम,रा.छोरा कॉलनी.छोरा हटला,छोरा बर्धमान बमन बाग्राम दोघे पश्चिम बंगाल यांनी सानू निमाई बिश्वास (वय-२५) रा.सरूलिया मंगलकोट, बर्धमान पश्चिम बंगाल यांस लाकडी दांडयाने मारहाण करून गंभीर जखमी करून ठार मारले असल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिगंबर होगे यांनी फिर्यादी दाखल केली आहे.घटनेनंतर या जखमीस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपशारार्थ दाखल केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.२४८/२०२० भा.द.वि.कलम ३०२,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी उपवीभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.या घटननेने कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close