कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरात नगरसेवकांवरच गुन्हा दाखल !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात या सप्ताहात जवळपास सहा कोरोना बाधित रुग्ण आढळूनही अद्याप नागरिकांचे डोळे उघडण्यास तयार दिसत नाही आता हेच पहा ना कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद मनोहर सय्यद यांनीच काल रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास डॉ.आंबेडकर चौकात आपल्या दुचाकीवर कुठलेही कागदपत्र न बाळगता व व शहरात व तालुक्यात कोरोना विषाणूची साथ सुरु आहे हे माहिती असतानाही आपल्या तोंडाला कुठलीही मुखपट्टी न बांधता इतर नागरिकांच्या आरोग्याला बाधा होईल असे वर्तन केल्याने त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलिसानी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहर पोलिस व नगरपरिषद आरोग्य विभाग यांनी संयुक्तरित्या एक मोहीम राबवून ४० हजार ५०० रुपयांचा विक्रमी दंड वसुळ केला तरीही नागरिक कोरोना साथीला गांभीर्याने घ्यायला तयार दिसत नाही.काल रात्री पुन्हा याचा कटू अनुभव शहर पोलिसांना आला असून कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद हेच स्वतः आपल्या दुचाकीवरून शहरात फिरताना तोंडाला मुखपट्टी न बांधता फिरताना आढळून आल्याने पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ३२६ ने वाढून ती ६ लाख ४९ हजार ५८६ इतकी झाली असून १८ हजार ६७७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख ९२ हजार ९९० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०८ हजार ३७६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५०६ वर जाऊन पोहचली आहे तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३० जुलै पर्यंत केली आहे.
कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता तालुका निरंक राहिला असताना आज करंजी येथील मूळ निवासी असलेला मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या एका रुग्णाची भर पडली आहे.त्यामुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्या नंतर ओमनागर परिसरात असलेल्या एका डॉक्टरच्या घरात पाच रुग्ण तर टाकळी ग्रामपंचायत शिवारात एक असे सात रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.दरम्यान कोपरगाव तालुका प्रशासनाने अधिक कडक निर्बंध लादुनही अद्याप काही नाठाळ नागरिक साधे-साधे नियम पाळताना दिसत नाही.दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहर पोलिस व नगरपरिषद आरोग्य विभाग यांनी संयुक्तरित्या एक मोहीम राबवून ४० हजार ५०० रुपयांचा विक्रमी दंड वसुळ केला तरीही नागरिक कोरोना साथीला गांभीर्याने घ्यायला तयार दिसत नाही.काल रात्री पुन्हा याचा कटू अनुभव शहर पोलिसांना आला असून कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद हेच स्वतः आपल्या दुचाकीवरून शहरात फिरताना तोंडाला मुखपट्टी न बांधता फिरताना आढळून आल्याने पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.त्यांनी तातडीने त्यांना थांबवून त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉ.राजू परशराम पुंड यांनी गु.रजि.नं २४३/२०२०भा.द.वि. कलम १८८(२),१८६,२६९,२७०,२९०,२७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
त्यात फिर्यादी हे.कॉ.राजू पुंड यांनी म्हटले आहे की,आरोपी मेहमूद सय्यद हे त्यांचे पासुन मानव जिवाला व आरोग्याला किंवा सुरक्षीततेला धोका होईल हे त्यांना माहीत असुन देखील त्याने विनाकारण गर्दी करुन समाजास धोका पोहचेल असे कृत्य केले तसेच त्यांनी जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांचे कडील आदेश क्रमांक आ.व्य.म.पु/कार्या/१९अ/१०४६/२०२० अन्वये कोरोना विषाणु (कोविड-१९) प्रदुर्भाव रोखन्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-१८९७ अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे तसेच संचार बंदी आदेशाचे उल्लघंन करुन,विना मास्क,विना हेल्मेट,सोबत वाहनाचे कागदत्रे न बाळगता त्याचेकडील मोटार सायकलवरुन कोपरगाव शहरात डॉ.आंबेडकर चौकात फिरताना मिळुन आले वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.