कोपरगाव तालुका
बियाणे फसवणूक,कंपनी विरुद्ध कोपरगावात गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कान्हेगाव,संवत्सर,ओगदी व इतर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवारात कृषिधन प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीचे के.एस.एल.४४१ या नावाचे विक्री केलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरले असता ते जवळपास ८० टक्के उगवलेच नाही.सदर कंपनीने हे बियाणे निकृष्ट दिल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी या कंपनीचे व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अभोंरे रा.जालना यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक यादवराव आढाव (वय-५३) यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बनावट बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांत खळबळ उडाली आहे.
जून महिन्यात पावसाच्या मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन,बाजऱ्या,मका आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली.या साठी ज्या कंपन्यांनी बियाण्याची खात्री दिली ते बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करून पेरण्या केल्या.मात्र कोपारगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी सोयाबीन उतार कमी आला तो ८० टक्क्यांपर्यंत कमी आला आहे.त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे
जून महिन्यात पावसाच्या मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन,बाजऱ्या,मका आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली.या साठी ज्या कंपन्यांनी बियाण्याची खात्री दिली ते बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करून पेरण्या केल्या.मात्र कोपारगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी सोयाबीन उतार कमी आला तो ८० टक्क्यांपर्यंत कमी आला आहे.त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे लवकर पाऊस येऊनही शेतकरी हवालदिल झाले आहे.या बाबत प्रसिद्धी माध्यमात अनेकांनी तक्रारी केल्या अनेकांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचेकडे तक्रारी केल्या होत्या.कोपरगावात अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्राणावर झाल्या आहेत.मात्र त्याकडे कंपन्यांनी आधी दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना वाली उरला नाही.कोपरगाव तालुक्यात आ. काळे यांच्याकडेही काही तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यांनी अनेक ठिकाणी पाहणी करून त्याला दुजोरा दिला होता.व निकृष्ठ बियाणे पुरविणाऱ्या कंपन्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव,संवत्सर,ओगदीसह बऱ्याच गावात या तक्रारींचा सूर होता.
त्यामुळे कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक यादवराव आढाव यांनी काल सायंकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी कृषिधन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक दगडू अंभोरे यांच्या विरुद्ध गु.र.न.१५८/२०२० भा.द.वि.कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ चे कलम ६ (ब),७ (ब) बियाणे नियम १९६८ चे कलम २३ (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.