जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात उधारीचे पैसे मागितल्याने रोखले पिस्तूल !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या ईशानेस साधारण दोन कि.मी. अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशन रस्त्यालगत वंडांगळे वस्तीवर रहिवाशी असलेल्या फिर्यादी विजय नारायण वंडांगळे (वय-४६) यांनी आरोपी राजेश रामकृष्ण जोशी रा.वडांगळे वस्ती यांचेकडॆ काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपली उधारी मागीतल्याच्या कारणावरून वंडांगळे यांच्या पतसंस्थेच्या केबिन मध्ये घुसून,” तुझे उधारीचे पैसे दिलेले आहेत तरी तू परत परत पैसे का मागतो असे म्हणत आज तुला जीवे ठार मारून टाकतो,खल्लास करतो असे म्हणून फिर्यादिवर पिस्तूल रोखून पिस्तुलचा खटका ओढून शिवीगाळ,दमदाटी केल्या प्रकरणी रात्री उशिरा साडे दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी विजय वंडांगळे व आरोपी राजेश जोशी हे दोघे अनेक वर्षांपासून मित्र आहेत.मात्र त्यांचे एकमेकाकडॆ नेहमी येणे जाणे आहे.फिर्यादीच्या मालकीचे हॉटेल व सहकारी पतसंस्था आहे.मात्र गुरुवार दि.२ जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा आरोपी राजेश जोशी हा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत आला व उधारीचे पैसे मागीतल्याचा राग येऊन फिर्यादीच्या केबिन मध्ये घुसून ,”तुझे उधारीचे पैसे दिलेले आहेत तरी तू परत परत पैसे का मागतो असे म्हणत आज तुला जीवे ठार मारून टाकतो,खल्लास करतो असे म्हणून फिर्यादिवर पिस्तूल रोखून पिस्तुलचा खटका ओढून शिवीगाळ,दमदाटी केली आहे”

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी विजय वंडांगळे व आरोपी राजेश जोशी हे दोघे अनेक वर्षांपासून मित्र आहेत.मात्र त्यांचे एकमेकाकडॆ नेहमी येणे जाणे आहे.फिर्यादीच्या मालकीचे हॉटेल व सहकारी पतसंस्था आहे.मात्र गुरुवार दि.२ जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा आरोपी राजेश जोशी हा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत आला व उधारीचे पैसे मागीतल्याचा राग येऊन फिर्यादीच्या केबिन मध्ये घुसून ,”तुझे उधारीचे पैसे दिलेले आहेत तरी तू परत परत पैसे का मागतो असे म्हणत आज तुला जीवे ठार मारून टाकतो,खल्लास करतो असे म्हणून फिर्यादिवर पिस्तूल रोखून पिस्तुलचा खटका ओढून शिवीगाळ,दमदाटी केली आहे”या प्रकरणी फिर्यादी विजय वंडांगळे यांनी तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी गु.र.न.२४२/२०२० भा.द.वि.कलम ३०७,४५२,५०४,५०६ व भा.हा.कायदा कलम ३/२५,३० प्रमाणे आरोपी राजेश जोशी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close