जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात”कृषी संजीवनी सप्ताह”उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेसंवत्सर-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव तालुका कृषि विभागा कडुन नुकताच “कृषि संजीवनी सप्ताह” कार्यक्रम मान्यरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

राज्यात कृषी दिनानिमित्त १ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याची संकल्पना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी गत आठवड्यात मांडली होती.स्वतः कृषी मंत्री नाशिक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन करणार आहेत. व शेतकऱ्यांची अनुवाद साधणार आहेत.या प्रार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे हा उपक्रम साजरा करण्यात आला आहे.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंडळ कृषि अधिकारी सी.एम.जवणे,कृषि सहाय्यक ए.पी.सावंत,शेतकरी मंगेश आबक,बाबासाहेब खर्डे, बाबुराव मैंद,कैलास सोनवणे,कृष्णा आबक,जगदीश पेकळे,बंडु माळी आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी मान्यवरांनी सोयाबीन पिकावरील किड व रोग नियंत्रण,कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रण,मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण,ऊसामधील हुमणी किड नियंत्रण,पंतप्रधान पिक विमा योजना मार्गदर्शन,हवामान आधारीत फळपिक विमा योजना,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा जनजागृती व प्रचार प्रसिद्धी,सेंद्रीय शेती,निंबोळी अर्क ५ टक्के केंद्र व राज्य सरकारच्या शेतीपुरक विविध योजनाव मार्गदर्शन,बी.बी.एफ.यंत्राचा वापर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक,फळबाग लागवड योजना माहिती व मार्गदर्शन,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मार्गदर्शन आदी माहिती देण्यात आली. बी-बियाणे,खते,कीटकनाशके खरेदी व कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी व मार्गदर्शन,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना मार्गदर्शन प्रचार प्रसिद्धी व कृषि विभागाच्या विविध योजना बदल मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close