जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या महाविद्यालयात तीन विषयांच्या संशोधनास मान्यता

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैय्या महाविद्यालयात भूगोल, रसायनशास्र व प्राणिशास्र विषयांचे पी.एचडी. संशोधन केंद्र सुरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच मान्यता दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.महाविद्यालयात या अगोदर मागील तीन वर्षापूर्वी हिंदी विषयाचे पी.एच.डी. संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आता महाविद्यालयात एकूण चार पी.एच.डी. संशोधन केंद्र झाले आहे.

कोपरगाव एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे संचालक गेल्या अनेक वर्षापासून पी.एच.डी. पदवीसाठीच्या संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील होते.त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाल्याने संस्था व महाविद्यालयाच्या प्रयत्नांना यश आले आहे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने गौरवास्पद- अशोक रोहमारे,अध्यक्ष कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी

सदर विषयांचे संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाल्याने कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील संशोधन करू इच्छिणाऱ्या होतकरू, हुशार व संशोधन उत्सुक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना या निमित्ताने एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून त्याचा लाभ कोपरगाव, येवला, राहता, लासलगाव,वैजापूर आदी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य यादव यांनी केले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार यावरील पी.एच.डी. संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जाणार असून त्या संदर्भात भूगोल विभाग प्रमुख डॉ. चव्हाण जी.के. (९७६६७६८०८२) रसायनशास्र विभाग प्रमुख डॉ. काळे एस.बी. (९८८१८६७३७४) व प्राणीशास्र विषयाचे प्रा. डॉ. शिंदे एन.जी. (९९२३३४८८६३) यांच्याशी संपर्क साधावा. महाविद्यालयात वरील विषयांसाठी संशोधन केंद्रासाठी मान्यता मिळाल्याने कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी याप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close