जाहिरात-9423439946
शैक्षणिक

गुरकुल शिक्षण पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा विकास-अध्यक्ष सुर्यवंशी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत असलेल्या आत्मा मलिक ध्यानपीठाच्या माध्यमातून अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात १९९५ साली आश्वासक पाऊल टाकत अनादी काळापासून चालत आलेली गुरूकुल शिक्षण पद्धतीस सुरवात केली. या पुरातन शिक्षण पद्धतीला आधुनिक साहित्याच्या मदतीने ध्यानातून संस्कार विद्यार्थ्यांवर होतात हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी ध्यानधारणेवर लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांतील आत्मविष्कार शोधून काढून मेंदुवर संस्कार करण्याची क्षमता वाढविण्याचे काम करण्यासाठी संस्थेमार्फत विशिष्ट पद्धत तयार करून शिक्षण पद्धतीला नवा आयाम दिला असल्याचे प्रतिपादन आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

शाळेत विद्यार्थ्यांचे ब्रेन मॅपींग करून ग्रहण क्षमतानुसार विभागणी करून त्या त्या अविकसित क्षमता विकसित करण्याकडे शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गट करून लक्ष केंद्रित केले जाते.त्यामुळे निम्न क्षमता असणा-या विद्यार्थ्यांत उच्च क्षमता विकसनासाठी ध्यानाचा उपयोग झाला.शाळेत २८ प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, एन.डी.ए.अकॅडमी,६२ प्रकारच्या खेळांची महाराष्ट्रातील भव्य क्रीडा अकादमी तसेच शैक्षणिक गुणवत्तेतील कामगिरी बाबतचा आलेख महाराष्ट्राला सुपरिचित करून दिला-नंदकुमार सूर्यवंशी अध्यक्ष आत्मा मालिक.

महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ आयोजित राज्य स्तरीय “शिक्षणाच्या आधुनिक वाटा” या वेबीनारमध्ये ते बोलत होते.महाराष्ट्रातील दहा मानांकित संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा व सद्यस्थितीत शिक्षण पद्धती शिक्षणाच्या कोणत्या वाटा संस्थेने हाताळल्या याचा परीचय महाराष्ट्राला व्हावा म्हणून राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले होते.
संस्थेच्या शैक्षणिक कार्याविषयी बोलताना सुर्यवंशी पुढे म्हणाले की,”शाळेत विद्यार्थ्यांचे ब्रेन मॅपींग करून ग्रहण क्षमतानुसार विभागणी करून त्या त्या अविकसित क्षमता विकसित करण्याकडे शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गट करून लक्ष केंद्रित केले जाते.त्यामुळे निम्न क्षमता असणा-या विद्यार्थ्यांत उच्च क्षमता विकसनासाठी ध्यानाचा उपयोग झाला.शाळेत २८ प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, एन.डी.ए.अकॅडमी,६२ प्रकारच्या खेळांची महाराष्ट्रातील भव्य क्रीडा अकादमी तसेच शैक्षणिक गुणवत्तेतील कामगिरी बाबतचा आलेख महाराष्ट्राला सुपरिचित करून दिला.

राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षणाच्या आधुनिक वाटा या वेबीनार आयोजना पाठीमागील माहितीच्या देवाण घेवाणीचा व संस्थाच्या कार्याचा परीचय इतरांना होऊन शिक्षक व छोट्या-मोठ्या संस्थांनी आदर्श घ्यावा या बाबतचा उद्देश प्रास्ताविकातून स्पष्ट केला. अशा अनोख्या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजन केलेबाबत अमरावतीचे शिवदत्त ढवळे यांनी क्रीडा शिक्षक महासंघाचे आभार मानले. गणेश म्हस्के यांनी कार्याचा परीचय करून दिला तर बाळासाहेब कोतकर यांनी आभार मानले. प्रशांत खीलारी व संतोष खैरनार यांनी तांत्रिक सहकार्य केले. या वेबीनारसाठी झूम व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हजारो शिक्षक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close