जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोना योध्यांना डॉ.आव्हाड यांचेकडून आयुर्वेदिक औषधे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना योध्याना कोपरगावातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रामदास आव्हाड यांनी दिली त्यांची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आणि धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म रुग्णालय यांचा सामाजिक बांधिलकी उपक्रतून भेट दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चीनमध्ये उद्रेक झालेला कोरोना या विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर आयुर्वेद,होमिओपॅथी व युनानी उपचार केल्याने ते बरे होतील अशा सूचना नुकत्याच आयुष मंत्रालयाने दिल्या आहेत.आयुष मंत्रालयाच्या या सूचनेवर सामाजिक संकेतस्थळावर सरकारची जोरदार खिल्ली उडवण्यात येत असली तरी कोरोनावर अद्याप जगभरात कुठेही औषध नसताना व ज्या देशात-चीनमध्ये हा आजार उद्भवला आहे तेथेही औषध नसताना सरकार आयुर्वेद,होमिओपॅथी,युनानी औषधांची यादी देत असल्याबद्दल नेटकऱ्यांनी सरकावर टीकेची झोड उठवली असली तरी प्रतिकार क्षमता वाढविण्यात हि औषधें महत्वाची भूमिका निभावू शकतात यावर बऱ्याच तज्ज्ञांचे एकमत दिसते.

चीनमध्ये उद्रेक झालेला कोरोना या विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर आयुर्वेद,होमिओपॅथी व युनानी उपचार केल्याने ते बरे होतील अशा सूचना नुकत्याच आयुष मंत्रालयाने दिल्या आहेत.आयुष मंत्रालयाच्या या सूचनेवर सामाजिक संकेतस्थळावर सरकारची जोरदार खिल्ली उडवण्यात येत असली तरी कोरोनावर अद्याप जगभरात कुठेही औषध नसताना व ज्या देशात-चीनमध्ये हा आजार उद्भवला आहे तेथेही औषध नसताना सरकार आयुर्वेद,होमिओपॅथी,युनानी औषधांची यादी देत असल्याबद्दल नेटकऱ्यांनी सरकावर टीकेची झोड उठवली असली तरी प्रतिकार क्षमता वाढविण्यात हि औषधें महत्वाची भूमिका निभावू शकतात यावर बऱ्याच तज्ज्ञांचे एकमत दिसते.त्यामुळे या उपक्रमाना बळ मिळत असून त्या प्रतिकार क्षमतेचा विस्तार करण्याचा व कोरोना योध्याना प्रतिकार करण्यात अहंम भूमिका निभावण्यात हि आयुर्वेदिक औषधे नक्कीच उपयुक्त ठरल्यास नवल नको.त्याचाच भाग म्हणून कोरोना संसर्ग विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन अभियान अंतर्गत भारत सरकारचे आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक उपचार संदर्भात प्राथमिक स्वरुपात काही आयुर्वेदिक औषधी संसर्ग रोग प्रतिकार शक्ती वाढविणे,कोरोना पासुन बचाव करणेकामी चवनप्राश,आयुष काँथ टँबलेट,गुडुची घनवटी अशा औषधी सुचविल्या आहेत.त्याचा आधार घेत महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म रुग्णालयाचे संचालक आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांचे माध्यमातून सामाजिक बांधिलकीने कोरोना निर्मुलनासाठी आघाडीवर काम करणारे कोरोनायोध्दे यांना देण्याचा प्रारंभ शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

या प्रसंगी आर्युर्वेदिक औषधे सेवन संदर्भात माहिती पत्रक तसेच कार्यालय परिसरात जनजागृती पत्रक वितरित करण्यात आले.श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांचेकडे शिर्डी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची औषधी देण्यात आली आहे.कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे,निवासी नायब तहसिलदार योगेश कोतवाल यांचेकडे तहसिल कर्मचारी व मंडलाधिकारी,तलाठी यांची औषधी सुपुर्द करण्यात आली आहेत. कोरोना केअर सेंटर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाटे,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली आव्हाड (बडदे) ,ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय डॉ.कृष्णा फुलसौंदर,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विनया ढाकणे,डॉ.अरुणा गाताडे,आयुर्वेदाचार्य कौस्तुभ भोईर,डॉ. वैभव गवळी,एस.एस.जी.एम.काँलेजचे प्राचार्य डॉ.शंकरराव थोपटे,उपप्राचार्य राजेंद्र झरेकर यांचे कडे कोविड केअर सेंटरची औषधी सुपुर्द करण्यात आली आहे.आपत्ती व्यवस्थापनात आघाडीवर गेल्या तीन महिण्यापासून अहोरात्र मेहनतीने काम करणारे भारत सरकारचे स्वच्छतादूत,सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखालील “मिशन चायना गेट” या पथकातील सदस्यांना औषधै सुपुर्द करण्यात आली आहे.

सदर औषधे पोलिस अधिकारी व कर्मचारी, वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामिण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी,कृषी अधिकारी कर्मचारी,पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी,ग्रामसेवक,पोलिस पाटील,कोपरगांव नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी,सर्व पत्रकार,यांचेसह कोरना निर्मुलनासाठी विविध आघाडीवर कार्यकरणारे सर्व घटक यांना उपलब्धतेनुसार टप्याटप्याने वितरित केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close