कोपरगाव तालुका
पोलीसांनी मदत नाकारली,जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील विधवा महिला शेतकरी उषा सूर्यकांत आभाळे,अवंतिका बाळासाहेब आभाळे यांच्या शेतात विरोधी व्यक्ती चंद्रकांत गोपीनाथ अभाळे,वैभव गोपीनाथ आभाळे, हे गट क्रमांक १२१ मध्ये येऊन ट्रॅक्टर व तत्सम यांत्रिक साधने बेकायदा घालून आपले नुकसान करीत असताना व आपली मिळकत हडप करण्याचा प्रयत्न करीत असताना आपण तक्रार करूनही कोपरगाव तालुका पोलीस अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्या प्रकरणी तक्रारदार महिलांनी या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार दाखल केली असून न्याय मागितला आहे.
मढी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार महिला उषा आभाळे व अवंतिका आभाळे यांचे शेतजमीन (ग.नं.१२१)आहे.या मिळकतीवरुन या दोन्ही गटांचे दिवाणी न्यायालयात व महसूल दप्तरी भांडण चालू आहे.त्याचा निवडा अद्याप झालेला नाही असे असताना समोरचे व्यक्ती चंद्रकांत आभाळे व वैभव आभाळे हे बेकायदा वरील महिलांच्या वरील क्रमांकाच्या शेतात बेकायदा ट्रॅक्टर ट्रेलर,घालून नुकसान करीत आहे.त्या महिलांना शिवीगाळ करत आहे.त्यांच्या असहायतेचा फायदा घेत असून त्यांच्या विरुद्ध वारंवार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करूनही वरील आरोपी या महिलांना त्रास देत आहे.पोलिस त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करित नाही.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी तहसीलदार यांनी संबंधितांना जमिनीत जाण्यासाठी रस्ता काढून दिलेला असल्याने व त्या विरुद्ध या महिला अपिलात गेलेल्या नसल्याने व त्या कारवाईला वरिष्ठ यंत्रणेने कुठलीही स्थगिती दिलेली नसल्याने हि कारवाई झाली आहे.दरम्यान विरोधी गटावर आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असल्याचे प्रतिपादन केले आहे.व आपल्याला दोन्ही गट सारखे असल्याने अन्याय करण्याचा कुठलाही उद्देश नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार महिला उषा आभाळे व अवंतिका आभाळे यांचे शेतजमीन (ग.नं.१२१)आहे.या मिळकतीवरुन या दोन्ही गटांचे दिवाणी न्यायालयात व महसूल दप्तरी भांडण चालू आहे.त्याचा निवडा अद्याप झालेला नाही असे असताना समोरचे व्यक्ती चंद्रकांत आभाळे व वैभव आभाळे हे बेकायदा वरील महिलांच्या वरील क्रमांकाच्या शेतात बेकायदा ट्रॅक्टर ट्रेलर,घालून नुकसान करीत आहे.त्या महिलांना शिवीगाळ करत आहे.त्यांच्या असहायतेचा फायदा घेत असून त्यांच्या विरुद्ध वारंवार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करूनही वरील आरोपी या महिलांना त्रास देत आहे.पोलिस त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करित नाही.त्यांच्या फिर्यादीची दखल घेत नाही.त्रास देणाऱ्या चंद्रकांत आभाळे व वैभव आभाळे यांनाच साथ देत आहे.जो विषय तहसीलदार व महसुली अधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेत येत असताना पोलीस त्यात विनाकारण दखल देऊन आपली अधिकार कक्षा ओलांडत आहे.पोलिसांना तहसीलदार यांचे अधिकार कक्षेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नसताना हे उद्योग सुरु आहे.त्यामुळे खऱ्या महिलांना न्याय मिळणे अवघड बनले आहे.तरीही जिल्हा पोलीस अधीक्षक व शिर्डी उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ यात लक्ष घालून या महिलांना न्याय द्यावा अशी विनंती या महिलांनी शेवटी केली आहे.