जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण,नागरिकांत खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात आता रुग्ण नाही असा दिलासा मिळाला असताना आता करंजी ग्रामपंचायत हद्दीत मूळचे रहिवासी असलेले मात्र चांदवड येथे आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या इसमाला कोरोना लागण झाली असल्याची खात्रीलायक माहिती तालुका आरोग्य विभागाने आमच्या प्रतिनिधीस दिल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता तालुका निरंक राहिला असताना आज करंजी येथील मूळ निवासी असलेला मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या एका रुग्णाची भर पडली आहे.त्यामुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ०१ हजार ०४० ने वाढून ती ३ लाख ९६ हजार ८७४ इतकी झाली असून १२हजार ९७२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख २४ हजार ३३१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०५ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २६१ वर जाऊन पोहचली आहे तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता तालुका निरंक राहिला असताना आज करंजी येथील मूळ निवासी असलेला मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या एका रुग्णाची भर पडली आहे.त्यामुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी तत्काळ करंजी या ठिकाणी धाव घेऊन या रुग्णाचे नातेवाईकव संबंधी यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.काही दिवसांपूर्वी या रुग्णाच्या बहिणीचा साखरपुडा करंजीत १५ मे रोजी पार पडला होता.त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हा निष्पन्न रुग्ण काही दिवसांपूर्वी अवस्थ वाटू लागल्याने चांदवड या ठिकाणी तपासणीसाठी गेला होता.तेथेच केलेल्या तपासणीत हा निष्कर्ष आला आहे.आता या रुग्णाने काही दिवसांपूर्वी करंजीत सुपारीच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने करंजीत ग्रामस्थ भयभीत झाले आहे.या घटनेला मोठा कालखंड उलटला असल्याने संशयितांच्या विलगीकरणा बाबत विचार करावा लागणार आहे.या रुग्णाची करंजीत भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येणे स्वाभाविक आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने हा भाग पूर्ण बंद करण्यास प्रारंभ केला आहे.

कोपरगाव शहरात पुन्हा एकदा संजयनगर परिसरात आयेशा कॉलनीत एक संशयित महिला असून तिला अस्वस्थ वाटत असल्याची खात्रीलायक माहिती आली आहे.सदर महिला गेले दोन महिने औरंगाबाद या ठिकाणी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती दोन-तीन दिवसांपूर्वी ती महिला कोपरगावात आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला नजीकच्या कोरोना उपचारार्थ रुग्णालयात भरती केले होते तेथे घेतलेल्या श्रावचा अहवाल आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात पुन्हा एकदा संजयनगर परिसरात आयेशा कॉलनीत एक संशयित महिला असून तिला अस्वस्थ वाटत असल्याची खात्रीलायक माहिती आली आहे.सदर महिला गेले दोन महिने औरंगाबाद या ठिकाणी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती दोन-तीन दिवसांपूर्वी ती महिला कोपरगावात आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला नजीकच्या रुग्णालयात भरती केले होते तेथे घेतलेल्या श्रावाचा अहवाल आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.घटनास्थळी नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली आहे. या बाबत प्रशासन माहिती देण्यास तयार नसले तरी त्यांनी या ठिकाणी धाव घेतली असून कार्यवाही सुरु केल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे.त्यामुळे शहर पुन्हा भयभीत झाला आहे.या बाबत अधिकारी मात्र अधिकृत दुजोरा देत नसल्याने शहरात गोंधळ उडाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close