जाहिरात-9423439946
दळणवळण

…या नदीच्या पुलासह रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आणि शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी ७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

(दोन्ही संकल्पित छायाचित्र)

मागील वर्षी पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला होता.त्यामुळे शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन,घोडेकर मळा या भागात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात होत होते.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी म्हाळुंगी नदीवरील पूल होण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती.

त्यानंतर खा.लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या पुलाच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी तसेच शहरांतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिवांना दिले होते. त्यानुसार वैशिष्ट्येपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषदांना वितरित करावयाच्या निधीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर आणि पंपिंग स्टेशन कडे जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी साडेचार कोटी रूपये,संगमनेर नगरपरिषद हद्दीत इंदिरा गार्डन आणि गार्डनचा दक्षिण व उत्तर बाजूचा परिसर सुशोभीकरण करणासाठी २० लाख रूपये,संगमनेर नगरपरिषद हद्दीत लिंक रोड नाशिक पुणे हायवे चौक सुशोभीकरण २० लाख,संगमनेर नगरपरिषद हद्दीतील भारत चौक सुशोभीकरण करणे १५ लाख,संगमनेर नगरपरिषद हद्दीत साई श्रद्धा चौक सुशोभीकरण करणे २० लाख,संगमनेर नगरपरिषद हद्दीत कोल्हेवाडी रोड नाटकी नाल्यावर पूल बांधणे आणि सुशोभीकरण करणे ३० लाख रूपये,संगमनेर नगरपरिषद हद्दीत स.नं.१५६ सखाहरी गुंजाळ यांचे खुल्या जागेत सुशोभीकरण कामासाठी १५ लाख रूपये,संगमनेर नगरपरिषद हद्दीत स.नं१२४ (३७२) पे. मधील ओपन स्पेस मध्ये सुशोभीकरण कामासाठी १० लाख रूपये,संगमनेर नगरपरिषद हद्दीत पाव बाकी रोड दुतर्फा बाजूस फुटपाथ करून सुशोभीकरण कामासाठी ७० लाख रूपयांचा निधी,संगमनेर नगरपरिषद अलकानगर नाटकी नाल्यावर पूल बांधणे व सुशोभीकरण कामासाठी ३० लाख रूपयांचा आणि संगमनेर नगरपरिषद हद्दीत कुरणरोडकडे जाणारा नाटकी नाल्यावर पूल बांधणे व सुशोभीकरण कामासाठी २० लाख रूपये असा एकूण ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे लवकरात लवकर या विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे खा.श्री. लोखंडे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close