जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोनामुळे ..हा व्याख्यानमाला कार्यक्रम रद्द

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुजन्य आजाराने थैमान घातलेले असल्याने कोणतेही कार्यक्रम सार्वजनिकरित्या न करता साध्या पध्दतीने ते पार पाडण्याचा निर्णय परजणे यांच्या स्नेहीजणांनी व्यक्त केला आहे.दरवर्षी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघावरील येत्या २० जून रोजीचे स्व. नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते मात्र या वर्षी कोरोना विषाणूंचा प्रताप सुरु असल्याने संसर्गाच्या भीतीमुळे कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

संघाचे संस्थापक स्व. नामदेवराव परजणे यांचा पुण्यस्मरण सोहळा दरवर्षी २० जून रोजी संघाच्या कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येतो.परंतु यावर्षी कोरोना विषाणुजन्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भव्य दिव्य कार्यक्रम स्थगित करण्यात आलेले आहेत.मात्र पुण्यस्मरणा निमित्त संघाच्या कार्यस्थळावर स्व. परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू
ओढवल्यास संघामार्फत अशा दूध उत्पादकांचा २० लाख रुपयाचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे. विमा कंपनीकडून विमाधारक दूध उत्पादकांना प्रमाणपत्रे वितरणाचा छोटेखाणी कार्यक्रम यावेळी करण्यात येईल.याशिवाय नामदेवराव परजणे सेवाभावी संस्थेच्यावतीने सामाजिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन गांवपातळीवरील दूध संस्थामार्फत तालुक्यातील संपूर्ण गावात प्रत्येकी १५ झाडे वाटप करुन वृक्षारोपण करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे छोटेखाणी कार्यक्रम शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालवून दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करुन पार पडणार असल्याचेही श्री परजणे पाटील यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close