जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ओगदी शिवारात ४.७७ लाखांची लूट,बारा जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ओगदी शिवारात पैठणी साड्या स्वस्तात देतो असे आश्वासन देऊन डहाणू येथील व्यापाऱ्यास बोलावून घेऊन त्यांच्याकडील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांची लूट केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विनोद चव्हाण रा.अनकाई ता.येवला जिल्हा नाशिक व त्याचे दहा ते बारा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी विनोद चव्हाण याच्या टोळीने फिर्यादी व्यापारी यांना त्यांच्या ओळखीचे निलेश महेश राऊत रा.वाडवन यांच्या मोबाईल फोनचा (९५५२४७७४५७) चा वापर करून तुम्हाला पैठणी साड्या अर्ध्या किमतीत देतो असे आमिष दाखवून फिर्यादी व्यापाऱ्यास ओगदी शिवारात ओगदी ते बोकटे जाणारे रस्त्याच्या कडेच्या शेतात बोलावून घेतले व सोबतच्या दहा-बारा साथीदारांनी लाकडी दांडके,चाकुचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी जवळील ०४ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

स्वस्तात सोने किंवा तदंगभूत वस्तू देतो असे आमीष दाखवून लूटमार करणाऱ्या टोळ्या कोपरगाव तालुक्यात कार्यरत आहे.मात्र अलीकडील काळात पोलीस अधिकारी कर्तव्यदक्ष असल्याने या गुन्ह्यात विलक्षण कमी आली होती.मात्र या गुन्हयाने गुन्हा डोके वर काढले असून कोपरगाव तालुक्यातील ओगदी ग्रामपंचायत हद्दीत काल असा गुन्हा घडल्याची बाब उघड झाली आहे.पटेलपाडा,वृषभ नोव्हेल्टी,”ए विंग”रुम क्रमांक२०२ दुसरा मजला,ता.डहाणू जिल्हा पालघर येथील व्यापारी विकास आत्माराम पाटील हे या टोळीच्या भक्ष्यस्थानी पडले असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यांना अनकाई येथील आरोपी विनोद चव्हाण याच्या टोळीने फिर्यादी व्यापारी यांना त्यांच्या ओळखीचे निलेश महेश राऊत रा.वाडवन यांच्या मोबाईल फोनचा (९५५२४७७४५७) चा वापर करून तुम्हाला पैठणी साड्या अर्ध्या किमतीत देतो असे आमिष दाखवून फिर्यादी व्यापाऱ्यास ओगदी शिवारात ओगदी ते बोकटे जाणारे रस्त्याच्या कडेच्या शेतात बोलावून घेतले व सोबतच्या दहा-बारा साथीदारांनी लाकडी दांडके,चाकुचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी जवळील २ लाख ६० हजारांची रोख रक्कम,४० हजार रुपयांचे एक तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,२० हजार रुपये किमतीचे पत्नी सुनीता पाटील हिच्या कानातील सोन्याचे झुबे,४० हजार रुपये किमतीची सोन्याची एक बांगडी,४ हजार रुपये किमतीचा एम.आय.कंपनीचा एक भ्रमणध्वनी,२० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,६ हजार रुपये किमतीचा एम.आय.कंपनीचा भ्रमणध्वनी,निलेश राऊत यांच्या जवळील दीड हजारांची रोख रक्कम,६० हजार रुपये किमतीची नानुभाई देवजी कडू यांच्या कडील गळ्यातील सोन्याची साखळी,त्यांचीच एक २० हजार रुपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी असा जवळपास ०४ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.

हि घटना घडल्यावर फिर्यादी व्यापारी आधी येवला शहर येथे गेले मात्र घटनास्थळ हे कोपरगाव हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्यावर पुन्हा हा गुन्हा त्यांनी कोपरगाव तालुका पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यावर तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.१४४/२०२०भा.द.वि.कलम.३९५,४२०,१२०(ब) अन्वये आरोपी विनोद चव्हाण व त्याच्या दहा ते बारा साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी श्रीरामपुरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके हे करीत आहेत.या घटनेने कोपरगाव तालुका परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close