जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कांद्याची मातीमोल भावाने खरेदी,शेतकरी नाराज

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

एकीकडे सर्वच शेतकऱ्यांना कोरोना साथीने कृषीमालाच्या भावाला मारले असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव कृत्रिम रित्या पाडून रडविण्याचे काम सुरु केल्याने शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. व कोपरगाव सह राज्यातील शेतकऱ्यांच्या कैवारी नेत्यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

कोपरगाव बाजार समितीत कांद्याला गोल्टि शंभर रुपयांपासून सुरु असून माध्यम कांदा ३०० ते ४०० तर उच्च प्रगतीचा कांदा केवळ ६०० रुपयांच्या आत खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.व बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली आहे.शिवाजी गायकवाड याना २२ गोणी कांद्याचे रिक्षा भाडे,पट्टी,हमाली वजा जाता अवघे १ हजार ५४३ रुपयांची पट्टी आली आहे.त्यामुळे त्यांनी डोक्याला हात मारून घेतला आहे.

परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्याने मागील काही दिवसाच्या तुलनेत ११०० रुपयांची दोन दिवसात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.जास्तीत जास्त २६५० सरासरी २३०० रुपये तर कमीत कमी ८०० रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र शेतकऱ्यांना व्यापारी नाडविण्यात समाधान मनात असून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.२० मे रोजी कांदा लिलावाच्या वेळी संवत्सर येथील शेतकरी शिवाजी बाबुराव गायकवाड यांच्या कांद्याला अवघा क्विंटलला १५० रुपये मिळाल्याने त्यांनी बाजार समितीच्या या व्यापारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.या धीच कांद्याला करपा या रोगाने ग्रासले आहे.त्यातच कोरोना या चिनी संकटाने भाव मारून टाकले आहे.आता नव्या दमाने भाव मिळतील हि आशा धरून शेतकरी आपला माल घेऊन आले तर त्यांच्यावर हि दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.

कांदा हा भारतातील बहुतांश नागरिकांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे.त्यामुळे साहजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.गरीब असो किंवा श्रीमंत असो कांदा हा प्रत्येक घरात वापरला जातो.त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली की सरकारला घाम फूटतो.लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हि देशातील कांद्याचे बाजारभाव ठरवते त्या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दराने चांगली उसळी घेतली असून नुकताच उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त २६३१ रुपये भाव जाहिर झाला असल्याचा दावा शेतकरी व पत्रकार शिवाजी गायकवाड यांनी केला आहे.

सध्या बाजारात येणारा कांदा मार्च महिन्यापासून चाळीत साठवलेला आहे. तो बराच काळ साठवलेला असल्याने कांद्याचे वजन घटल्याने मिळणाऱ्या भावातून शेतकरी वर्गाचा झालेला खर्च आणि तोटा आता कुठे तरी निघण्यास सुरुवात झाली असताना हा बट्याबोळ झाला आहे.त्यामुळे कांद्याचे दर पाडण्यासाठी शासनाने आयात करणे, निर्यातबंदी करणे असे न करता जे काही शेतकऱ्यांना मिळत आहे ते मिळू द्यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल अशी विनंतीही बाजार समितीला शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close