कोपरगाव तालुका
चांदेकसारे रस्त्याचे उदघाटन उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वाहतुकीचे दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या चांदेकसारे ते एंडकी नाला रस्त्याचे स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, रस्त्याचे लाभार्थी व मोजके कार्यकर्ते सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
दरम्यान आज कोळपेवाडी ते कोळगाव थडी रस्त्याचे स्थानिक विकास निधीतून १९.९९ लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते आज पार पडले आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे,कोळगाव थडीच्या सरपंच संगिता विलास निंबाळकर,कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे,कोळगाव थडीचे उपसरपंच आप्पासाहेब जाधव,कचरू कोळपे,गंगाधर चव्हाण,ज्ञानेश्वर हाळनोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे, कनिष्ठ अभियंता दिलीप गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.