कोपरगाव तालुका
कोपरगावातील..त्या रुग्णांचा अहवाल प्राप्त,
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आज कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील मनाई वस्ती येथील २२ वर्षीय महिलेचा संशयित कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या महिलेचा श्राव तपासणी अहवाल आज उशिरा प्राप्त झाला असून तो नकारात्मक आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.
या पूर्वी शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत एक सारी रुग्णांचा मृत्यू तर कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक महिलेचा मृत्यू झालेला आहे.कालच कोपरगाव शहर तब्बल दोन महिन्यानंतर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हि बातमी आल्याने बसल्याने व्यापारी,नागरिक पुन्हा गडबडून गेले होते.आता मात्र नागरिक,व्यापारी यांना चिंतेचे कारण राहिले नाही.
राज्यात कोरोनाची ४४ हजार ५८२ नागरिकांना लागण झाली असून या विषाणूने १५१७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७१ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही या आधीच कोरोनाचे दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र काल अचानक संवत्सर मनाई वस्ती येथील २२ वर्षीय महिलेचे निधन झाल्याने व प्रशासनाने संशयित जाहीर केल्याने तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने हा भाग तातडीने पूर्ण बंद केला होता.
दरम्यान या रुग्णांचा अहवाल कधी प्राप्त होणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून होते.तो अहवाल आज सायंकाळी आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.त्यामुळे तालुका प्रशासनांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.या पूर्वी शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत एक सारी रुग्णांचा मृत्यू तर कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक महिलेचा मृत्यू झालेला आहे.कालच कोपरगाव शहर तब्बल दोन महिन्यानंतर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हि बातमी आल्याने बसल्याने व्यापारी,नागरिक पुन्हा गडबडून गेले होते.आता मात्र नागरिक,व्यापारी यांना चिंतेचे कारण राहिले नाही.पालिकेने आज दिवसभर जनता संचारबंदी लागू केली होती त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.