जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उगीच कोल्हेकुई करून शेतकऱ्यांत संभ्रम करू नका-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आवर्तन सुरु झाल्यापासून जलसंपदा अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना वेळोवेळी सूचना देऊन एकही लाभार्थी शेतकरी आवर्तनापासून वंचित राहिलेला नसताना काही माजी पदाधिकाऱ्यांनी उगीच कोल्हेकुई करून जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम सुरु ठेऊन शेतकऱ्यांची करमणूक सुरु ठेवली असल्याची टीका प्रगतशील शेतकरी दिलीप शिंदे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

मागील पाच वर्षात शेती सिंचन आवर्तनाचे कसे तीन तेरा वाजले हे लाभधारक शेतकरी विसरले नाहीत व शेतकऱ्यांनी काय भोगले आहे हे पण शेतकरी विसरले नाहीत.आपल्या काळात जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आवर्तन तर सोडाच पण अडीच किलोमीटरच्या आतच तर काही ठिकाणी दीड ते दोन किलोमीटरच्या आतच शेतकऱ्यांची पाण्याच्या बाबतीत केलेली बोळवण शेतकरी आजही विसरलेला नाही-शिंदे.

कोपरगाव तालुक्यातील दोषींवर कारवाईचा इशारा देताच हरिसन ब्रँच चारीला सोडले अशा स्वतःला शेंदूर फासून स्वतःच्या आरत्या ओवाळून घेणाऱ्या बातम्या काही आवडीच्या वृत्तपत्रात पॆरून स्वतःचे प्रतिमा मंडन करून एका माजी आमदारांनी कोपरगाव तालुक्याची नुकतीच चांगली केल्याने शेतकरी दिलीप शिंदे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,मागील पाच वर्षात शेती सिंचन आवर्तनाचे कसे तीन तेरा वाजले हे लाभधारक शेतकरी विसरले नाहीत व शेतकऱ्यांनी काय भोगले आहे हे पण शेतकरी विसरले नाहीत.आपल्या काळात जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आवर्तन तर सोडाच पण अडीच किलोमीटरच्या आतच तर काही ठिकाणी दीड ते दोन किलोमीटरच्या आतच शेतकऱ्यांची पाण्याच्या बाबतीत केलेली बोळवण शेतकरी आजही विसरलेला नाही.जेव्हापासून आवर्तन सुरु झाले तेव्हापासून आ.आशुतोष काळे यांचे आवर्तनावर लक्ष होते.सर्व शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ व्हावा यासाठी वाढीव आवर्तन मंजूर करून घेतले होते.सर्व शेतकऱ्यांचे भरणे झाल्याशिवाय आवर्तन बंद करू नये असे आदेश पाटबंधारे विभागाला देऊन त्याचा पाठपुरावा होत होता.या उलट मागील पाच वर्षांचा आवर्तनाचा शेतकऱ्यांना आलेला अनुभव कसा होता हे माहित आहे. होता.सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचे नियोजन योग्य होते त्या नियोजनातून हरिसन ब्रँचसह डाव्या, उजव्या कालव्यावरील सर्व लाभधारक शेतकऱ्यांचे भरणे झाले असून हे मागील पाच वर्षात कधीही घडले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.मात्र ज्यांनी आपल्या तोंडाने कबूल केले आहे की, प्रत्येक पाण्याच्या आवर्तनात हरिसन ब्रँच लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही त्यांनी असे वक्तव्य करणे मोठा विनोद असल्याचे दिलीप शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close