कोपरगाव तालुका
..या तालुक्यात दोन ठिकाणी ९१ हजारांची रस्ता लूट,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे संकट घोंघावत असताना व पोलीस प्रशासन त्या बाबत कारवाईत मग्न असताना आज पहाटे मुंबई-नागपूर महामार्गावर आज पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यानी कातकडे पेट्रोल पंप व पुणतांबा चौफुली नजीक एकापाठोपाठ पंधरा मिनिटांच्या अंतराने दोन ट्रकच्या चालकांना लोखंडी कत्तीचा धाक दाखवून व लाथाबुक्य्यांनी मारहाण करून त्यांच्या कडून अनुक्रमे ५६ हजार व ३५ हजार अशी ९१ हजारांची रोकड घेऊन पोबारा केल्याने ट्रक चालकांत भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
कोपरगाव शहरापासून मुंबई-नागपूर हा जुना राज्यमार्ग जात असून हा रस्ता फारच खराब झालेला आहे.त्यामुळे वहाने हळू गतीने जात असतात. या मार्गाने नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग ठरत असल्याने वाहानाची मोठी गर्दी असते. या मार्गावर रस्तालुटीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे.या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरासह राज्यात व देशभरात कोरोनाने कहर केलेला आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनावर याच कामाचा अतिरिक्त कामाचा भार आलेला असताना आता त्यांना पुन्हा जुन्या डोकेदुखीने डोके वर काढले आहे.कोपरगाव शहरापासून मुंबई-नागपूर हा जुना राज्यमार्ग जात असून हा रस्ता फारच खराब झालेला आहे.त्यामुळे वहाने हळू गतीने जात असतात. या मार्गाने नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग ठरत असल्याने वाहानाची मोठी गर्दी असते. या मार्गावर रस्तालुटीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे.कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक पदावर राकेश मानगावकर यांची नियुक्ती झाल्या पासून शहर व परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.हे वास्तव असताना गत मार्च महिन्यात कोरोना साथीने आपले डोके वर काढल्याने पोलीस व महसूल प्रशासनाचा सगळा वेळ या रस्त्यांची नाकेबंदी,संचार बंदी,विविध वाहनाच्या तपासण्या यातच वेळ जात आहे.बाकी गुन्हेगारीची नागरिक घरातच रहात असल्याने कमी झाली होती.मात्र आता सरकारने जमावबंदी व वाहने चालविल्यास काही अंशी सूट दिल्याने चोरट्यांना आता मोकळे रान मिळाले आहे.आज सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास राजस्थान मधील ट्रकचालक लालाजी राम पालसिंग तोमर (वय-५०) रा.बाटर बक्स,अरोरा फार्म, वार्ड क्रं.४ भिंड.ता.जि. भिंड हे आपल्या ताब्यातील ट्रक (एम.एच.१५ इ.जी.४७१७) घेऊन जात असताना ते कातकडे पेट्रोल पंपा समोर पत्ता विचारण्यासाठी थांबले असता अज्ञात चार चोरटे त्यापैकी एकाचे अंगात काळ्या रंगाचे जॅकेट बाकी तिघेजण सडपातळ अंगकाठी असलेले यां चौघा चोरट्यानी ट्रॅकचे केबिन मध्ये घुसून लोखंडी कत्तीचा धाक दाखवून हाताचे चापटीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील ५६ हजार रुपये काढून घेतले आहे.व त्या नंतर पोबारा केला आहे.
दरम्यान आणखी पंधरा मिनिटांनी पुणतांबा चौफुलीवर याच वर्णनाचे चोरट्यानी ट्रकचालक वैभव फुला वाघ (वय ३१) रा.वरचे टेम्भे ता.सटाणा जिल्हा नाशिक यांनाही वरील लोखंडी कत्तीने धाक दाखवुंन फिर्यादीचे मालक यांच्या खिशातील ३५ हजारांची रोकड बळजबरीने काढून घेऊन पोबारा केला आहे.वरील दोन्ही ट्रक चालकांनी या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३९२,५०४,५०६,३४ प्रमाणे तर दुसऱ्या गुन्ह्यात भा.द.वि.कलम ३९७ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड व पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.