जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात घरफोडी,२२ हजारांचा माल लंपास

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या उत्तरेस सुमारे दोन की.मी.असलेल्या अंबिकानगर परिसरात रहिवाशी व फिर्यादी असलेले मुन्ना राजू शेख (वय ४३) हे आपल्या घरात झोपले असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास अंगात नारंगी रंगाचा सदरा व जीन्स विजार घातलेल्या एका अज्ञात चोरट्याने बजाज पल्सर या दुचाकींचा वापर करत घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करून घरातील चार ग्राम वजनाची सोन्याची पोथ,१० हजारांची रोख रक्कम,एक सॅमसंग कंपनीचा व दुसरा एम आय कंपनीचा भ्रमणध्वनी असा २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.त्या मुळें अंबिकानगर परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात सध्या कोरोनाचा कहर सुरु असताना आता बऱ्याच अंशी टाळेबंदी उठवली आहे.मात्र चोरट्यानी आपली हात की सफाई दाखविण्यास सुरुवात केली आहे.त्याचे प्रत्यन्तर नुकतेच अंबिकानगर या उपनगरातील नागरिकांना आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी गु.र.न.१७२/२०२० भा.द.वि,कलम.४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close